हेडलाइन

पंचायत लर्निंग सेंटर खुरसापार येथे जिल्हा संवाद प्रशिक्षण संपन्न

Summary

पंचायत लर्निंग सेंटर खुरसापार येथे जिल्हा संवाद प्रशिक्षण संपन्न ,,,,,,,,, अटल भूजल योजने अंतर्गत भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय संवाद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत लर्निंग सेंटर खुरसापार येथे करण्यात आले . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतीचे […]

पंचायत लर्निंग सेंटर खुरसापार येथे जिल्हा संवाद प्रशिक्षण संपन्न ,,,,,,,,, अटल भूजल योजने अंतर्गत भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय संवाद प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत लर्निंग सेंटर खुरसापार येथे करण्यात आले . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव कृषी मित्र व काटोल, नरखेड तालुक्यातील कृषी सहाय्यक विविध विभागाचे अधिकारी यांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर सर वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर माने मॅडम काटोल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री श्री सर मार्गदर्शक व उपस्थित होते.कार्यक्रमाला प्रामुख्याने उदघाटक म्हणून उपस्थित असलेले काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री चरणसींग जी ठाकूर साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती,अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामाची तांत्रिक माहिती समोरील राहिलेल्या कामाचे नियोजन येणाऱ्या अडचणी व त्याची सोडवणूक जलसंधारण संदर्भातल्या विविध शासनाच्या भूमिका नैसर्गिक जल संरक्षण, आधुनिक शेती याविषयी तांत्रिक मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम संपन्न झाला, खुरसापार गावाने केलेल्या जलयुक्त शिवार योजना, अटल भूजल योजना व शासनाच्या विविध योजना उत्कृष्ट रीतीने प्रत्यक्षात राबविलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी साहेब, माननीय आमदार साहेब यांनी केली व खुरसापार येथे झालेल्या कामाची बाकी गावांनी सुद्धा असे काम करावे असे मनोगत जिल्हाधिकारी साहेब यांनी व्यक्त केले जलसंवर्धन व पर्यावरण संदर्भात शाश्वत कामे ग्रामपंचायतने करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले, अधिकारी यांनी आपली सकारात्मत भूमिका ठेऊन कामे करावे, अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश दिले.त्याचबरोबर मा.आमदार साहेबांनी,जलसंवर्धन, शेती व अनेक विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, परंतु कामे ही उत्कृष्ट दर्जाची करावी, विविध योजना ह्या चांगल्या पद्धतीने दर्जेदार कराव्या असे आव्हान सरपंचांना व अधिकाऱ्यांना केले. अटल भुजल योजने व कामा संदर्भात वरिष्ठ भूवैघानिक डॉ. वर्षा माने मॅडम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात काटोल येथील उपविभागीय अधिकारी साहेब, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी, काटोल व नारखेड तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्राम पंचायत खुरसापार चे उपसरपंच श्री, विनायक साठे, सौं. अन्नपूर्णा पराची, बेबीताई सहारे, सौं,पूजा गजभिये,विलास कातलाम, योगेश गोतमारे,कृषी मित्र दिनेश ठाकरे, समीर ऊमपि उपस्थित होते, कु. जया पाटील ग्रामसेवक खुरसापार यांनी आभार मानले….भुजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी प्रमुक्याने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *