निवासी उपजिल्हाधिकारी मा. मोरे साहेब यांना मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना रद्द करण्याबाबत आशिष सोनटक्के भिम आर्मी चे निवेदन
महाराष्ट्र सरकारने दिनांक 14-07-2024 रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना त्वरित रद्द करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व लोकांना न्याय देण्यात बाबत आशिष सोनटक्के भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे विदर्भ अध्यक्ष यांनी निवेदन सादर केले, महाराष्ट्र सरकार यांनी दिनांक 14-07-2024 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय काढला असून मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना हा शासन निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीय लोकांना न्याय द्यावा विशेष या शासन निर्णय यात सांगण्यात आले आहे की भारतातील विविध तिर्थ क्षेत्र चे दर्शनासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निधी खर्च करण्यात येणार आहे, हा निधी तीर्थयात्रा साठी खर्च करून मागासवर्गीय लोकांना विविध योजनेपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सरकार करत आहे,त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामधील निधी हा चुकीच्या पद्धतीने खर्च होणार असून मागासवर्गीय व आंबेडकरी संघटना ,पक्ष नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध करत आहे.
एकीकडे सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत छत्रपती राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करत असून
1) छत्रपती राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी दहावीसाठी फक्त तीस लाखापर्यंत शिष्यवृत्ती तर पीएचडी साठी 40 लाखापर्यंत व त्यात निर्वाह भत्ता वेगळा नाही. म्हणजे 12 लाख निर्वाह भत्ता तर शिक्षण शुल्क 18 लाख प्रति वर्षे ज्यात अनेक विद्यार्थ्यांचे पूर्ण शिक्षण शुल्क ही भरून होत नाही या अगोदर पूर्ण शैक्षणिक ही आणि निर्वाह भत्ता दिला जायचा (uk: 9.900 pounds तर USA $15.400)असाचा.
2) आता दहावी व बारावी आणि पदवीमध्ये 75 टक्के गुण असणे आवश्यक केले आहे, तर शिष्यवृत्तीसाठी पात्र समजण्यात येईल तसेच पीएचडी मास्टर मध्येही 75 टक्के गुण असणे अनिवार्य केले आहे, या अगोदर पदवी आणि मास्टर साठी 55% गुण असणे आवश्यक होते
3) आता 8 लाखापर्यंत उत्पन्नाची अट लावण्यात आली असून या अगोदर पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर उत्पन्नची अट नव्हती .
4)एका कुटुंबातील एकच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो या अगोदर एका कुटुंबातील किमान दोन विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते
5)आताच्या नियमानुसार मास्टरसाठी एकदा शिष्यवृत्ती मिळाली असेल तर पुढे पीएचडी करिता ती शिष्यवृत्ती मिळणार नाही ,अशा अटी शर्ती लावून मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे ,तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय निधीचा मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना काढून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निधीचा गैरवापर करत आहे ,त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय त्वरित रद्द करून अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय लोकांनावर होणारा अन्याय दूर करून न्याय द्यावा.
महाराष्ट्र सरकारने हा शासन निर्णय त्वरित विशेष लक्ष देत रद्द न केल्यास आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष ,रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येईल.याची नोंद घ्यावी असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मा. मोरे याना दिले ,तेव्हा भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के ,बंटी रंगारी ,कमलेश उमरे,दीक्षित सोनटक्के ,आकाश उमरे,प्रणय कांबळे, राहुल वानखेडे, वैभव नाखले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.