निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज,आचारसंहितेचे पालन करा काटोल विधानसभा मतदार संघात 2,72647मतदार बजावनार मतदानाचा अधिकार म.प्र.सीमे सह 06 चेकपोस्ट सज्ज
काटोल/कोंढाळी-
भारत निवडणूक आयोगाने 09-रामटेक लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 48-काटोल विधानसभा मतदार संघात एकुण मतदारसंख्या 2लाख 72 हजार 647एवढी असुन पुरुष मतदार संख्या 1 लाख 39 हजार 320 व स्त्री मतदार संख्या 1 लाख 33 हजार 321 तर इतर मतदार संख्या 06 एवढी आहे. सर्व्हिस व्होटर 413ज्येष्ठ नागरीकांची मतदार संख्या 4 हजार 927 एवढी आहे. तर पी डब्लू डी मतदारांची संख्या 1575 एवढी आहे. एवढी आहे. काटोल विधानसभा मतदार संघात एकुण 328 मतदान केंद्रे आहे. तर 18-19 वयोगटातील नवमतदारांची संख्या 3 हजार 924 एवढी आहे.
काटोल विधानसभा मतदार संघामध्ये प्रिसायडिंग अधिकारी व पोलिंग अधिकारी एकुण1444 31 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काटोल विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी 06- S.S.T पथके
कोंढाळी ,जलालखेडा,
मोहदी दळवी ,गोंधनी,पिलापूर,व चोर खैरीअसे एकूण या 06
चेकपोष्टवर पुरेशा मनुष्यबळासह तैनात करण्यात आलेली असुन या चेकपोस्टवर येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्यात येत आहे. तसेच 4 Flying Squad देखील तैनात करण्यात आलेली आहेत. काटोल मतदार संघात होणाऱ्या विविध पक्षांचे कार्यक्रम, सभा, इत्यादीवर देखरेख ठेवण्यासाठी 4 V.S.T कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. मतदारांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्यासाठी स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याची पाणी, दिव्यांगासाठी रँप, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था व प्रतिक्षालय उभारण्यात येणार आहे.
निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले S.S.T, F.S.T.VST.VVT पथके, क्षेत्रिय अधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. काटोल विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निवडणूक काळात 48काटोल विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया शांततेत, निस्पृह वातावरणात पार पाडावी तसेच सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान करावे, असे आवाहन उपविभागीयअधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज पडोळे,48काटोल विधानसभा मतदार संघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या प्रसंगी काटोल तहसीलदार- राजू रणवीर , नरखेड तहसील उमेश खोडके, नागपूर ग्रामीण तहसीलदार -बाळासाहेब टेळे, तसेच ना त विजय डांगोरे, जंगले,व अन्य सहायक अधिकारी उपस्थित होते.
00000