गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

निरीक्षक पराशर यांचेकडून निवडणूक व्यवस्थेची पाहणी. स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केंद्रांना भेट

Summary

प्रा शेषराव येलेकर / सह संपादक गडचिरोली,दि.01 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट […]

प्रा शेषराव येलेकर / सह संपादक

गडचिरोली,दि.01 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आज येथील स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्ष व मतदान केद्रांना भेट दिली.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने श्री पराशर यांनी कृषी महाविद्यालय येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे व इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निवडणुक निरीक्षक श्री पराशर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था आहे का याबाबत पाहणी केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीवी यंत्रणा, अग्नीरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेल्या कृषी महाविद्यालयाचा परिसर त्रिस्तरीय बॅरिकेट लावून सुरक्षीत करण्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इव्हीएम साठवणूक कक्षाला श्री पराशर यांनी भेट देवून तेथील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. याठिकाणी सिसिटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा व पुरेसे विद्युत दिवे आहेत का याबाबत पाहणी केली. तसेच इव्हीम साठवणूक कक्षाला भेट देणाऱ्यांच्या नोंदी अभ्यागत नोंदवहीत नोंदविल्या जातात का याबाबत विचारणा करून नोंदवहीची तपासणीही केली.
श्री पराशर यांनी एलआयसी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समिती परिसर व रामनगर येथील पीएम जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा या मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याच्या पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील खर्च निरीक्षण कक्षालाही त्यांनी भेट देवून तेथील नोंदवह्यांची पाहणी केली.
सहायक निवडणूक अधिकारी श्री मीना यांनी निवडणूक निरीक्षक पराशर यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
००००

प्रा शेषराव येलेकर
सह संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *