BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

निधन वार्ता:- सेवानिवृत्त जि प केंद्रप्रमुख हरिभाऊ चिकटे गुरुजी यांचे अचानक आपल्यातुन निघून गेल्याने एका शिक्षकाची प्रतिक्रिया

Summary

सेवानिवृत्त जि प केंद्रप्रमुख हरिभाऊ चिकटे गुरुजी यांचे अचानक आपल्यातुन निघून गेल्याने एका शिक्षकाची प्रतिक्रिया* मृत्यू २९ एप्रिल २०२१ला सकाळी१० वाजता अंतिम संस्कार त्यांचे निवासस्थानी सावरगाव येथे १वाजता करण्यात आला अरे देवा!! शेवटी एकदाचा वनवास संपविला देवानी या देवरूपी व्यक्तीचा […]

सेवानिवृत्त जि प केंद्रप्रमुख हरिभाऊ चिकटे गुरुजी यांचे अचानक आपल्यातुन निघून गेल्याने एका शिक्षकाची प्रतिक्रिया*
मृत्यू २९ एप्रिल २०२१ला सकाळी१० वाजता अंतिम संस्कार त्यांचे निवासस्थानी सावरगाव येथे १वाजता करण्यात आला
अरे देवा!!
शेवटी एकदाचा वनवास संपविला देवानी या देवरूपी व्यक्तीचा 🙏🏼
माझ्या सेवेतील पहिले केंद्र प्रमुख खरंच प्रामाणिक कर्तव्य कशाला म्हणतात याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे स्व हरीभाऊ चिकटे गुरूजी
झिलपा केंद्रात 4-5 शाळा या त्यावेळी रोड सोडा साधा रस्ता नसलेल्या तरीही हे महाशय दर महिन्याला नियमानुसार प्रत्येक शाळेत दोन भेटी पायी प्रवास करून द्यायचेच
दादा बापु करून आपले काम चोखपणे बजावत असत
त्यांची भली मोठी बॅग व त्यात सर्व केंद्र प्रमुखांच आॅफीसच जणू…
शरीराने ठेंगण्या बांध्याचे त्यात एका हाती वजनी बॅग एका बाजूने वाकल्याचा भास होत असल्याने गंमत व काळजी वाटायची
चिकटे गुरूजींनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात खुप वनवास भोगला त्यांच्या वनवासाचे माझेसह अनेक जण प्रत्यक्षदर्शी आहेत
शेवटी असेच म्हणावे लागेल कर्तव्यदक्ष माणसाला काळाने हिरावून नेले.
गुरूजींच्या आत्म्यास ईश्वर चिर शांती लाभो
आणि मुलीला वडीलांचे जाण्याने झालेल्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.,
संजय निंबाळकर नागपूर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद व सर्व पदाधिकारी यांचे तर्फे हरिभाऊ चिकटे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते💐💐💐💐💐💐💐💐💐
*भावपूर्ण श्रद्धांजली*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *