– : निधन वार्ता : – श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन
कन्हान : – साईबाबा आश्रम शाळा टेकाडी चे मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश पुंडलिकरावजी खौरे रा. गणेश नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च ला सकाळी ११ वाजता कामठी येथील खाजगी रूग्णालयात कोरोना आजारा च्या उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. ते ४९ वर्षा चे होते. त्यांचे मुळ गाव टेकाडी येथील स्मशान घाटा वर सायंकाळी ४ वाजता अंतिम संस्कार करण्यात आला. ते पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.