नितीन तुमाने यांना अटक
Summary
जिल्हा शल्यचिकित्सक यांना सामान्यरुग्णालयाच्या गैरसोयीबाबत विचारला होता जाब जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसोबत होणाऱ्या गैरसोईबाबाबत दिनांक 7 सप्टेंबर रोजी नितीन तुमाने आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना जाब विचारला होता,कोरोना वार्डात CCTV कॅमेरे लावण्यात यावे,आणि त्याचे प्रसारण बाहेर […]
जिल्हा शल्यचिकित्सक यांना सामान्यरुग्णालयाच्या गैरसोयीबाबत विचारला होता जाब
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसोबत होणाऱ्या गैरसोईबाबाबत दिनांक 7 सप्टेंबर रोजी नितीन तुमाने आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना जाब विचारला होता,कोरोना वार्डात CCTV कॅमेरे लावण्यात यावे,आणि त्याचे प्रसारण बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांना दाखविण्यात यावे,रुग्णांना व कोरेन्टीन असलेल्या लोकांना चांगले जेवण पूरविण्यात यावे अश्या विविध मागण्यांसाठी आणि मागील काही दिवसात कोरोना वार्डात झालेल्या संशयास्पद मृत्यू बाबत जाब विचारायला गेले होते परंतू शल्यचिकित्सक यांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
लोकशाहीत लोकांच्या समस्या मांडणे व जाब विचारणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न नितीन तुमाने यांनी विचारला आणि ही सूडबुद्धीने माझ्यावर केलेली कारवाई आहे असे सांगितले आणि लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.