निःशुल्क वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी भंडारा
कुमार मॅरेज ब्यूरो तर्फे बुद्धीस्ट वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक १४ मे २०२३ रोज रविवारला कुमार मॅरेज ब्यूरो सभागृह, आंबेडकर वॉर्ड, ई. एल. चर्च रोड, भंडारा येथे करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यक्रमामध्ये वधू-वर यांची नोंदणी ही निःशुल्क करण्यात येऊन सर्व जातीय बुद्धिस्ट वधू-वर परिचय मेळावा हा निःशुल्क घेण्यात येणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष हे कुमार मॅरेज ब्युरो चे संचालक कुमार नयन शेंडे हे राहणार असून; कार्यक्रमाचे आयोजक हे सामाजिक कार्यकर्ते अमर वासनिक राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तुमसर तहसील येथील ग्राम नाकाडोंगरी निवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. राजेशभाऊ उके असणार आहेत. प्रस्तुत वधू वर परिचय कार्यक्रमात विवाह इच्छुक वधू वर तसेच त्यांचे आप्त-स्वकीय यांची उपस्थिती ही प्रार्थनीय असून सोबत वधू वर यांचे रंगीत फोटो घेऊन यायचे आहे.
प्रस्तुत कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ९३०९४८८०२४ या कुमार मॅरेज ब्युरो च्या मोबाईल क्रमांकावर निःशुल्क संपर्क साधता येईल.