ना.अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने निराधार योजनेची बैठक संपन्न 915 पात्र निराधारांच्या संचिका मंजूर – तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांची माहिती
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.23, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड येथे गुरुवार ( दि.18 ) रोजी तहसिल कार्यालयात निराधार योजनेची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेसाठी 384 तर श्रावण बाळ योजनेसाठी 531 असे एकूण 915 पात्र संचिकांना मंजुरी देण्यात देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांनी दिली.
सरकारच्या नवीन निकष प्रमाणे सरकारने निराधार योजनेच्या कमिटी ऐवजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गटविकास अधिकारी , मुख्याधिकारी यांची सदस्य म्हणून तर नायब तहसीलदार यांची सदस्य सचिव म्हणून शासकीय कमिटी स्थापन केली. त्या अनुषंगाने कोरोनाच्या संकटकाळात वयोवृद्ध व निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे शासकीय कमिटीच्या माध्यमातून बैठक घेऊन पात्र निराधारांच्या संचिका त्वरित निकाली काढा अशा सूचना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने 18 फेब्रुवारी रोजी शासकीय कमिटीच्या झालेल्या बैठकीत ऑनलाइन झालेल्या सर्व पात्र संचिका निकाली काढण्यात आल्या.
गुरुवार ( दि.18 ) रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली निराधार योजनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीस शासकीय सदस्य म्हणून गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, नायब तहसिलदार संजय सोनवणे, नगर परिषद प्रतिनिधी सुनील गोराडे यांची उपस्थिती होती. तर अव्वल कारकून आशिष औटी, परेश खोसरे, सुभाष राऊत, कोतवाल गजानन हासे , बळीराम जामकर यांनी सहकार्य केले.
———————————————-
ज्यांच्या संचिका आवश्यक कागदपत्रे अभावी नामंजूर झाल्या आहेत त्यांनी सदरील पूर्तता करून द्यावी. यातील पात्र संचिका त्वरित निकाली काढण्यात येईल. निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
——————————————-
निराधारांना आधार देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली आहे. आचारसंहितेच्या कारणामुळे निराधार योजनेची बैठक होवू शकली नाही असे स्पष्ट करीत लवकरच ही बैठक होणार असल्याने जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात संचिका दाखल करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या 15 दिवसांपूर्वी विविध गावांत केले होते.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड प्रतिनिधी