नाल्यात बुडून माय लेकिचा मृत्यू. लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील घटना

लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील घटना कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या मायलेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोथनी धर्मापुरी येथे घडली सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम वय ४५ आईचे तर दिव्या विजय मेश्राम व १६ वर्ष असे मृत्यूचे नाव आहे .गावा शेजारून हाकेच्या अंतरावर नाला वाहत आहे .उन्हाळी फसल लागवड असल्यामुळे नाल्याला पाणी वाहत पाणी असते म्हणून गावातील महिला या ठिकाणी रोज महिला कपडे धुण्यासाठीजात असतात न्यायालयावर काही अंतरावर वनराई बंधारा असल्यामुळे पुढे पाणी जास्त असते कपडे धुताना दिव्याच्या हातून टावेल निसटले ते घेण्यासाठी मुलगी पाच मीटर पुढे धावली मुलगी गेली म्हणून आई सुद्धा धावली पण खोल पाणी व पाण्यावर वेल असल्याने ती सुद्धा खोल पाण्यात बुडाली त्यांच्यासोबत कपडे धुत असलेल्या दोन महिलांनी घटनेची माहिती तात्काळ गावात येऊन सांगितली सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळतात ठाणेदार अमरदास धंदर व इतर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढले मात्र त्यावेळी मायलेखीचा घटनास्थळीत मृत्यू झाला होता .पोलिसांनी दोन्ही पोस्टमार्टम साठी लाखांदूर ला पाठवले असून पुढील तपास दिघोरी पोलीस स्टेशन अमरदास धंदर करित आहे.