चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

नाम. सुधीरभाऊ भांबावले, केला अशोभनीय प्रकार .( ओव्हरस्मार्ट बनणे टाळावे – बंडू नगराळेंचा सल्ला )

Summary

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, विकासपुरुष नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जयंती निमित्य अभिवादनाचे होर्डिंग्स आज 27 सप्टेंबरला लावले आहेत , जेव्हा की ही जयंती दोन दिवसापूर्वी म्हणजे 25 सप्टेंबरला होती . साधारणपणे असे होर्डिंग्स एकदोन दिवसाअगोदर किंवा त्या […]

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, विकासपुरुष नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जयंती निमित्य अभिवादनाचे होर्डिंग्स आज 27 सप्टेंबरला लावले आहेत , जेव्हा की ही जयंती दोन दिवसापूर्वी म्हणजे 25 सप्टेंबरला होती . साधारणपणे असे होर्डिंग्स एकदोन दिवसाअगोदर किंवा त्या दिवशी लावायचे असतात. परंतु सुधीरभाऊंनी ते चक्क दोन दिवसानंतर लावले . यावरून त्यांना बॅरिस्टर साहेबांच्या जयंती दिनाचा विसर पडला होता हे स्पष्ट होते . तरीही ते वेळेवर अभिवादन करण्यास आले , हे स्वागतार्ह्य होते . परंतु त्यांनी या प्रसंगाचे छायाचित्र मिळवून दोन दिवसानंतर अभिवादनाचे होर्डिंग्स लावले, हा अशोभनीय प्रकार आहे , अशी टिका वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे यांनी केली आहे .
सुधीरभाऊंनी उशिराने हे होर्डिंग्स लावल्याची बाब सर्वांच्या लक्षात आल्याने, तो आता चर्चेचा विषय झाला आहे . यावर नगराळेनी एका संदेशाद्वारे सुधीरभाऊंना सल्ला देताना हे ‘ ओव्हरस्मार्ट ‘ बनण्याच्या प्रयत्नातून झाले असे म्हटले आहे . यापूर्वी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी एक अनावश्यक विधान करून सुधीरभाऊ टिकेस पात्र ठरले होते , त्याची त्यांना दारुण पराभवात किंमत मोजावी लागली . आताही ते सातत्याने ओवरस्मार्ट बनण्याचा प्रकार करितच आहेत . अलीकडे क्लब ग्राउंडच्या मागणीला त्यांनी ही
” सनसनाटी निर्माण करण्याची मागणी आहे “, असे संबोधून बौद्धांच्या भावनांचा अपमर्द करण्याचा प्रयत्न केलाच होता. एकंदरीत त्यांचे सरकारमधील महत्व कमी झाल्याने ते भांबावलेले दिसतात , यातूनच हे प्रकार घडत आहेत , ते त्यांनी टाळावे , असेही नगराळेनी सुधीरभाऊंना सुचविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *