नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २४ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.