नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार
कोरोनाला रोखण्यासाठी आता तोंडाला मास्क लावणे अनिर्वाय करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरतील अशा लोकांवर आजपासून गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बोलताना दिली.
पंढरपुरातील स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे माघी यात्रेचा सोहळा शांतेत पार पडल्याचेही अतुल झेंडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
अतुल झेंडे यांनी सांगितले की, सध्या कोरोनाची साथ वाढू लागली आहे.त्यातच कोरोनाचे नवे स्वरूप समोर येऊ लागले आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
यापुढचे काही दिवस कसोटीचे आहेत. नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय लोकांनी विनाकारण गर्दी करू नये.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
यामध्ये मास्कचा वापर अनिर्वाय करण्यात आला आहे. जे लोक विना मास्कचे फिरताना आढळून येतील, अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील. मॉल, हॉटेलसह सर्व आस्थापनांमध्येही मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
पोलिसांसमोर माघी यात्रेचे मोठे आव्हान होते. परंतु शहरातील नागरिकांनी व वारकरी भाविकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे माघी यात्रा शांततेत आणि विना भाविकांविना पार पाडता आली.
यामध्ये विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीसह स्थानिक सामाजिक संघटना आणि संस्थांचे देखील योगदान मोठे आहे. संचारबंदीच्या काळात देखील सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.माघी यात्रेनंतर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने आज एक दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला तर सर्वांनाच नियमांचे पालन करावे लागणार आहे.मास्क वापराबाबत पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये आणि मॉलची तपासणी केली जाणार आहे.
तपासणी दरम्यान विना मास्कचे लोक आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचेही श्री. झेंडे यांनी सांगितले
सचिन सावंत मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750