BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

नागपूर कन्हान- कांद्री येथे पश्चिम बंगाल येथील हिंसाच्या विरोधात निषेध आंदोलन राष्ट्रपती राजवट लागु करुन दोषियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

Summary

*नागपूर* कन्हान : – पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधली असुन भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करतांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. परंतु पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाला नंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला […]

*नागपूर* कन्हान : – पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधली असुन भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करतांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. परंतु पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाला नंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला असुन भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु झालं आहे. या हिंसा चारातील बळींचा आकडा १५ चा वर पोहोचला असुन या हिंसाचारा विरोधात भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिका-यांनी कन्हान, कांन्द्री येथे निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करीत दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिका-यांनी केंन्द्र सरकार ला केली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सरचिटणीस चन्द्रशेखर बावनकुळे यांचा आदेशा नुसार कोरोना काळातील शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून संपुर्ण महाराष्ट्रात पश्चिम बंगाल सरकार च्या विरोधात प्रत्येक बुथ प्रमुख केंन्द्रावर निषेध आंदो लनचे निर्देश देण्यात आल्याने कन्हान, कांन्द्री येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान द्वारे अध्यक्ष अतुल हजारे व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांचा नेतृत्वात पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी आणि दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिका-यांनी केंन्द्र सरकार ला केली आहे. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, महामंत्री अमिष रूंघे, तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, सौरभ पोटभरे, संकेत चकोले, लोकेश आंबाळकर, महामंत्री सुनिल लाडेकर , संजय रंगारी, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, अमन घोडेस्वार, स्वाती पाठक, अलदीराम कनोजीया सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *