BREAKING NEWS:
हेडलाइन

नागपुर येथे कोरोना योद्धा सत्कार सोहळा पार पड़ला

Summary

आज दिनांक 4 आक्टोंबर 2020 रोज रविवार ला पोलीस योद्धा न्युज नेटवर्क व डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांचे संयुक्त विद्यमाने “कोरोना योद्धा सत्कार सोहळा” पार पडला. याप्रसंगी डॉ शारदा कृष्णकांत रोशनखेडे यांचा कोरोना योद्धा म्हणून मा. सुधाकरजी कोहळे, […]

आज दिनांक 4 आक्टोंबर 2020 रोज रविवार ला पोलीस योद्धा न्युज नेटवर्क व डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांचे संयुक्त विद्यमाने “कोरोना योद्धा सत्कार सोहळा” पार पडला. याप्रसंगी डॉ शारदा कृष्णकांत रोशनखेडे यांचा कोरोना योद्धा म्हणून मा. सुधाकरजी कोहळे, आमदार, दक्षिण नागपूर, मा. किशोरजी कुमेरिया, मा. उपमहापौर, नागपूर, मा. दुनेश्वरजी पेठे, नगरसेवक मा. संजयजी निंबाळकर,नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद ,मा,अरुण वनकर सचिव जय जवान जय किसान संघटना,मा,शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष मा,विठ्ठल ठाकरे,डायरेक्टर फिनिस पब्लिक स्कूल नागपूर मा,राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर पोलीस योद्धा न्युज नेटवर्क तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.डॉ शारदा रोशनखेडे यांना कोरोना योद्धा मणून सन्मानित करण्यात आले,
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ शारदा रोशनखेडे यांनी कोरोना काळात विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शिक्षण विभाग यांच्या साठी लिहिलेले “माझे विश्व लेकरांचे” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. हा कार्यक्रम लालबहादूर शास्त्री मनपा शाळा, हनुमान नगर, नागपूर येथे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *