नागपुरात ‘आरक्षण शिखर परिषद’ — भारतातील आरक्षण धोरणाचा समग्र आढावा घेतला जाणार

नागपूर,२७ जुलै २०२५ (रविवार):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलाच्या वतीने भारतातील आरक्षण धोरणाचा समग्र आढावा घेण्यासाठी ‘आरक्षण शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता नागलोक, कामठी रोड, नागपूर येथे पार पडणार आहे.
या परिषदेमागे दोन ऐतिहासिक पृष्ठभूमी आहेत —
🔹 २६ जुलै १९०२ रोजी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेला आरक्षण कायदा
🔹 १९८२ साली मा.बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आयोजित केलेली आरक्षण शिखर परिषद
या दोन महत्त्वपूर्ण घटना लक्षात घेऊन, सद्यस्थितीत भारतातील आरक्षण धोरणांचा सर्वांगीण अभ्यास आणि चिंतन या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे
…..
🔷 उदघाटन सत्र सकाळी १०.३० वाजता:
उदघाटक:
मा.अनिल वैद्य – माजी न्यायमूर्ती, नाशिक
मुख्य वक्ता:
मा.ॲड.डॉ.सत्यपाल कातकर,राजुरा,
अधिवक्ता उच्च न्यायालय,
माजी प्राचार्य,
शिक्षणतज्ञ,
मनोवैज्ञानिक.
विशेष निमंत्रित:
मा.प्रा.डॉ. इसादास भडके, प्रख्यात विचारवंत, लेखक,चंद्रपूर.
अभिप्राय.
मा.प्रा.देविदास घोडेस्वार, संविधान सभेतील डिबेट्स अनुवादक,
अध्यक्ष:मा. प्रदीप गायकवाड, राष्ट्रीय संघटक, समता सैनिक दल.
—
🔷 द्वितीय सत्र (दुपारी १.०० वाजता):
विषय:
महिला आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आणि अर्थसंकल्पातील (बजेटमधील) वाटा
वक्ते:
प्रा. अस्मिता अभ्यंकर – महिला प्रमुख, समता सैनिक दल
ॲड.गणेश भोईर रा.सचिव, फुले आंबेडकर राष्ट्रीय विध्यार्थी पालक संघटना.
मा.प्रा.संजय अभ्यंकर, केंद्रीय कार्यकारी सदस्य, समता सैनिक दल
–🔷 तृतीय सत्र (दुपारी ३.०० ते ५.००):
विषय:
न्यायपालिकेतील व पदोन्नतीतील आरक्षण :कर्मचारी संघठणाची भूमिका.
वक्ते:. ॲड.गुणरत्न रामटेके – ज्येष्ठ विधिज्ञ, कायदे सल्लागार, समता सैनिक दल.
मा. नरेंद्र जारोंडे, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिपेंडंट लेबर युनियन,
मा. संघदीप उके,
म.राज्य सचिव, इंडिपेंडंट लेबर युनियन
🔷 विशेष परिसंवाद (सायंकाळी ५.०० ते ६.३०):
विषय:
आरक्षण धोरण आणि युवकांची स्पंदने
सहभागी.
मा.डॉ.अवनीकुमार पाटील,
व्ही.एन.आय.टी तथा अध्यक्ष,फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी पालक संघटना,
सहभाग-राहुल गुढे, प्रशिक आनंद, राहुल तामगाडगे, श्रेया बडगे, आयुष्य तागडे, निशांत चव्हाण, आरोही रामटेके, आदित्य रामटेके, ओजस्विता रामटेके
आयोजक-
शेखर गायकवाड, राष्ट्रीय महासचिव, समता सैनिक दल,
राहुल सोमकुवर, समन्वयक समिती,समता सैनिक दल,
संजय फुलझेले, संयोजक,बजेट वाटा मंच,
नागसेन बडगे, संघठन, समन्वयक, समता सैनिक दल…
ही परिषद आरक्षणाच्या विविध अंगांवर सखोल विचारविनिमय घडवून आणणार असून, समाजातील शोषित, वंचित घटकांना हक्काच्या आरक्षणासाठी नवी दिशा व प्रेरणा देणारी ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
—