BREAKING NEWS:
हेडलाइन

नांदुरा रेल्वे गेट एक अभिशाप. .!

Summary

नांदुरा रेल्वे गेट एक अभिशाप. .!   भरवशाचा म्हैस दुध देत नाही.   विजय पोहनकर यांनी व्यक्त केले विचार.   गडचिरोली चक्रधर मेश्राम दि 14/2/2022:-   भारतातील सर्व रेल्वे गेट मानव रहित करण्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री ह्यांनी संसद मध्ये जाहीर […]

नांदुरा रेल्वे गेट एक अभिशाप. .!

 

भरवशाचा म्हैस दुध देत नाही.

 

विजय पोहनकर यांनी व्यक्त केले विचार.

 

गडचिरोली चक्रधर मेश्राम दि 14/2/2022:-

 

भारतातील सर्व रेल्वे गेट मानव रहित करण्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री ह्यांनी संसद मध्ये जाहीर केले आहेच. त्याच धर्ती वर 2014 ला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे गेट येथे उड्डाणपूल बांधण्याचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. उद्घाटक खुद्द नामदार नितीनजी गडकरी (पुलकरी) हे होते. त्यांच्या कामावर जनतेला प्रचंड आस्था असल्याने हा उड्डाणपूल 2016 पर्यंत पूर्ण होऊन जनतेला मारायची वेळ येणार नाही,हा दृढ विश्वास होता.मात्र,भरवश्याची म्हैस दूध देत नाही हीच प्रचिती नितीनजी नी आम्हा लोकांवर आणली.जळगांव (जामोद) ते नांदुरा तालुक्यातील लोकांसाठी हे रेल्वेगेट मरणाचे द्वार झाले आहे.जळगांव (जामोद) तालुका हा आदिवासी बहुल भाग आधीच विकासापासून कोसो दूर,कोणताही आजार येथे दूरस्थ होईल अशी दवाखान्याची व्यवस्था नाही.हृदयाचे पेशंट तर हमखास देवाला प्रिय झालेत फक्त या भागात दवाखाने नसल्याने त्यात कित्येक जीव अंबुलन्स गाडीतच या गेट मुळे गेले.परीक्षेला वेळेवर न पोहचणे,कोर्टाचे कामे,कार्यालयीन कामे या रेल्वे फटकाने नेस्तनाबूत केले.नांदुरा रेल्वे गेट जणू आमच्या नशिबात पाप आहे,घरातून निघतांना एक भीती कायम मनात असते गेट उघड मिळेल का? विशेषतः 3 -3 गाड्या एकाच वेळी पास होताना तर जीव टांगणीला लागतो.तास भर गेटवर अडकून पडणाऱ्या व्यक्तीला,समूहाला तो वेळ काढणे म्हणजे जेलवरी करण्यासारखे आहे.ह्यावर कोणताच राजकीय पक्ष ओरडत नाही,आंदोलन करीत नाही.राजकीय पक्षनेत्यांनी बुद्धी गहाण ठेवल्यागत सर्व सुरू आहे.

नामदार नितीनजी गडकरी ह्यांची प्रतिमा एक इमानदार,कर्तृत्वानं मंत्री अशीच उभी झाली असल्याने किमान त्यांनी आपल्या हातून उद्घाटन झालेल्या कार्याची पुर्ती करावी.हीच या भागातील लाखो लोकांची मनीषा आहे.जेवढे जीव या रेल्वे गेट ने घातले,भविष्यात घेईल त्या सर्व जीवाचे पाप आपण घेऊ नये,एवढीच माफक इच्छा. नांदुरा रेल्वे गेट दररोज भांडणाचे कारण ठरत आहे.नांदुरा शहरातील जनतेला व्यापारी मंडळींना ट्राफिक जाम चे दुर्दैव आहे.ह्या भागात करोना मुळे मास्क न लावता प्रदूर्शन, धूळ,ट्रक, मोठ्या गाड्यांची धुरंडी नाकात शिरते तेव्हा मरण यातना होतात, डोळ्यांची आग होते.एवढं सर्व फक्त एका उड्डाणपूल न बांधल्याने होत असेल तर हा उड्डाणपूल का होत नाही? काय राजकारण आहे.तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की गल्लीबोळात उड्डाणपूल होता आहेत,मुंबईत स्वतः गडकरींनी 56 उड्डाणपूल बांधले.मग लाखो लोकांचा जीव टांगणीला लावणारा नांदुरा रेल्वे उड्डाणपूल कधी बांधणार हा प्रश्न आता सामान्य लोकांनीच नामदार गडकरींना दिल्ली मंत्रालयात पत्र पाठवून विचारला पाहिजे.कारण राजकीय धेंड फक्त मतं मागण्यापूरते राहिलेत का? हा प्रश्न आम्हाला उपस्थित करण्याचा नाही.मात्र,राजकीय पक्ष नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाला बंगल दिल्यास निवडणुकीत लोक चपला मारतील.कारण ज्यांच्या घरातील कामविता माणूस फक्त आणि फक्त या रेल्वे फटकाने गेला असेल ते घर तुम्हाला सोडणार नाहीच. व्यापारी मंडळी सोडणार नाहीच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *