महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी

Summary

मुंबई, दि. 07 : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी नवीन पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. आता अशा पूर्णत: नवीन बांधणी झालेल्या टुरिस्ट […]

मुंबई, दि. 07 : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी नवीन पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. आता अशा पूर्णत: नवीन बांधणी झालेल्या टुरिस्ट टॅक्सी, सर्व तीन चाकी मालवाहू वाहने व 7,500 किलोग्रॅम पेक्षा कमी सकल भार क्षमता असलेली चारचाकी या परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी अधिकृत वाहन वितरकांमार्फत होणार आहे.

या निर्णयाचे ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे. या वाहनांची नोंदणी आता विक्रेत्यांकडेच होणार असल्यामुळे वाहन धारकांना परिवहन कार्यालयाकडे वाहनांना आणायची गरज नाही. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास वाचणार आहे. या निर्णयाचा लाभ जवळपास 7 ते 8 लाख वाहनधारकांना होणार आहे.

नोंदणीबाबतचे अधिकार विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. टुरिस्ट टॅक्सीमध्ये मीटर्ड टॅक्सी वगळून नवीन बांधणी केलेल्या टॅक्सीचा समावेश असणार आहे. यापूर्वी वाहन वितरकांमार्फत नवीन दुचाकी व कार या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे.  आता परिवहन संवर्गातील पूर्ण नवीन बांधणी असलेल्या वाहनांची सर्व वाहनांची नोंदणी 4.0 प्रणालीवर अधिकृत वाहन विक्रेत्यामार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन वितरकांनी 4.0 संगणकीय प्रणालीवर परिवहन संवर्गातील नवीन पूर्ण बांधणी झालेल्या वाहनांची नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

 

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *