गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांनी जनतेचे व कार्यकर्त्यांचे मानले आभार

Summary

ढोरपा व पहारणी ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व जनतेचे आभार मानण्यासाठी भेट देऊन आपल्या भाषणात प्रचलित राजकीय सामाजिक व आर्थिक स्थितीची जाणीव करून देऊन लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार […]

ढोरपा व पहारणी ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व जनतेचे आभार मानण्यासाठी भेट देऊन आपल्या भाषणात प्रचलित राजकीय सामाजिक व आर्थिक स्थितीची जाणीव करून देऊन लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. खासदार डॉ.नामदेव किरसान त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समन्व्यक चिमूर विधानसभा क्षेत्र सतीश वारजुरकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष परीवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभीड प्रमोद चौधरी, डॉ.आमिर धमांनी, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे, दिगंबर गुरपूडे, पुरुषोत्तम बनकर, साईस वारजुरकर, भूपेश कोरे, निखिल वारजूकर, संकेत वारजूरकर, नदीम नाथांनी, प्रशांत गेडाम, शहराध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी नागभिड सौ.सुनिता डोईजळ, सौ. नीतू घुरपुडे, सौ. माला मुळे, सौ. शितल जांभुळे, सौ. पुनम बघमारे, सौ.सुनंदा माटे, आशा गायकवाड, योगिता मिसार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *