नवउद्योजकांसाठी रु.५० लाखापर्यंत कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी प्र. जिल्हाधिकारी धनाजी पाटील
Summary
गडचिरोली,(जिमाका)दि.22: शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) ही योजना रारज्य शासनामार्फत राबविली जाते. या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लाभार्थ्यांचे Maha-Cmegp.gov.in या वेबसाईडवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज विहित कागदपत्रांसह करावयाचा आहे. […]
गडचिरोली,(जिमाका)दि.22: शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) ही योजना रारज्य शासनामार्फत राबविली जाते. या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लाभार्थ्यांचे Maha-Cmegp.gov.in या वेबसाईडवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज विहित कागदपत्रांसह करावयाचा आहे. अर्ज मंजुरीनंतर शासनाकडून मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयाव्दारे त्यांनी निर्धारित केलेल्या बँकांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणा-या कर्जात संलग्न अनुदान योजना आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्पादन स्वरुपाच्या उद्योगास प्रकल्प मर्यादा रुपये 50,00,000/- लक्ष असून सेवा / कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रुपये 20,00,000/- लक्ष आहे. बँक व्दारा मंजुर शहरी भागातील राखीव प्रवर्गातील (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक / ना.मा.प्रवर्ग /भटके विमुक्त / अल्पसंख्यांक) प्रकल्पास 25% तर अराखीव प्रवर्गास 15% अनुदान देय राहणार आहे, तर ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गास 35% तर अराखीव प्रवर्गास 25% अनुदान देय राहणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येत असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आलेले कर्ज प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारसीने ६७ कर्ज प्रकरणे ११ मे,२०२३ रोजी सरकारी बँकेसह खाजगी सहयोगी बँकांकडे सादर करण्यात आले आहे. बँकव्दारा कर्ज मंजुर उमेदवारांना प्रशिक्षणाची सोय सुध्दा करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक युवक / युवतीनी जिल्हा उद्योग केंद्रास संपर्क साधावा. व मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
****
प्रा शेषराव येलेकर
सह. संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क