नयाकुंड वळणावर दोन ट्रकची जोरदार धडक अपघातात दोन्ही ट्रक चालक जख्मी.

नागपूर कन्हान : – आमडी फाटा ते पारशिवनी रोड वरील नयाकुंड वळणावर दोन ट्रकची सामोरासामोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक चालक जख्मी झाल्याने पारशिवनी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवार (दि.१३) ला दुपारी ३ वाजता दरम्यान आमडी फाटा ते पारशिवनी रोडवरील नयाकुंड वळणा वर माणिकचंद राजेंद्रप्रसाद तिवारी वय ३६ वर्ष रा. महरछा त. हडीया जि. इलाहबाद (उत्तर प्रदेश ) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्र. यु पी ६२ बी टी ५११७ ने पारशिवनी कडुन आपल्या साईडने जात असताना विरूध्द येणारा ट्रक क्र. एम एच ४० बी एल २८६७ च्या चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवुन रॉग साईड ला येऊन फिर्यादीचे ट्रक चालकां च्या बाजुला सामोरासामोर जोरदार धडक मारल्याने आरोपी ट्रक क्र. एम एच ४० बी एल २८६७ च्या चाल कांचा उजवा हाताला गंभीर जख्मी होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली. फिर्यादी ट्रक चालक माणिक चंद तिवारी चा हात जख्मी होऊन डोक्याला किरकोळ मार लागला. सदर अपघातात आरोपी ट्रक चालक स्वत: जख्मी होऊन कारणीभुत ठरल्याने फिर्यादी ट्रक चालक माणिकचंद तिवारी यांचे तोंडी तक्रारीवरून पारशिवनी पोलीसांनी पोलीस निरिक्षक साहेबाच्या आदेशाने अप क्र. १३५/२१ कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला.