नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

नगर परिषद – नगर पंचायत मालमत्ता भाडे तत्वावर हस्तांतरण करीता अभ्यास गट काटोल न प चे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची अभ्यास गटावर सदस्य म्हणून निवड

Summary

काटोल – वार्तारह- नगरपरिषद व नगरपंचायतीची मालमत्तांचे भाडे तत्वावर हस्तांतरण व नुतनीकरण याचे प्रारूप नियम निश्चितीसाठी अभ्यास गट स्थापन करण्याची मागणी काटोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चरणसिंह ठाकूर यांनी शासनाकडे केली होती. या […]

काटोल – वार्तारह-
नगरपरिषद व नगरपंचायतीची मालमत्तांचे भाडे तत्वावर हस्तांतरण व नुतनीकरण याचे प्रारूप नियम निश्चितीसाठी अभ्यास गट स्थापन करण्याची मागणी काटोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चरणसिंह ठाकूर यांनी शासनाकडे केली होती.
या प्रकरणी राज्य सरकारने अभ्यास गट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आदेश क्र नामपा-१२२३/प.क्र.१८२/ न वि-२६,नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायतीची आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५चे कलम ९२मधे नगर परिषदेच्या स्थावर मालमत्ता हस्तांतरण,भाडे पट्टा,व भाडेपट्याचे नुतनीकरण करण्यात बाबद तरतुद उपलब्ध आहे.या तरतूद च्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपालिका (स्थावर मालमत्ता हस्तांतरण) नियम१९८३मधे सुधारणा दि.२०सप्टेबर२०१९रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.नगरपरिषद व नगर पंचायतींचे स्वरूप वेगळे असल्याने नियमावली सुधारणा करने आवश्यक आहे.त्यामुळे स्थावर मालमत्ता हस्तांतरण भाडे पट्टा,भाडे पट्ट्या चे नुतनीकरण करण्याबाबत प्रारुप नियम निश्चितीसाठी अभ्यास गट तयार करण्याचे मागणी नुसार अभ्यास गट स्थापन करण्यासाठी काढलेल्या आदेशात आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन बेलापूर महाराष्ट्र राज्य -मनोज राणडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य –
सह सचिव/उप सचिव विधी व न्याय,
विद्या हम्पय्या-उपसचीव नगर विकास विभाग, अनिरुद्ध जेवळीकर -उपसचीव नगर विकास, जमीर लेंगरेकर -अतिरिक्त आयुक्त उल्हास नगर महानगर पालिका धनंजय बोरीकर मुख्याधिकारी नगर परिषद काटोल,व विलास धईंजे कक्ष अधिकारी ‌नगर‌विकास विभाग
अशा हा सात सदस्यीय अभ्यास गट राज्यातील विविध नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये मालमत्ता हस्तांतरण १९८३मधे सुधारणा तसेच नगर परिषदा व नगर पंचायतींचे उत्पन्न व व्यापक जनहिताचा परामर्श घेऊन नियम निश्चितीकरणे साठी प्रारूप निश्चित करण्यासाठी हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून. तिन आठवड्यात प्रारुप नियमावली अंतिम करण्याचे आदेशात म्हटले आहे. हा आदेश नगर विकास विभाग उपसचिव विद्या हम्पय्या यांचे सहीने काढण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *