नगरपंचायत मुख्य अधिकारी यांनी दिला खोटा अहवाल स्वतःच्या हाताने स्वतःच गुलाल लावण्याचे काम निलंबन करा नगर विकास संघर्ष समितीच्या इशारा
प्रतिनिधी मोहाडी
नगरपंचायत मोहाडी मध्ये झालेला भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत मोहाडी नगर विकास संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन चौकशी करून दोषींवर कारवाई केली होती. त्यानुसार चौकशी अहवाल मागविण्यात आला होता. मात्र मोहाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी भ्रष्टाचाराबाबत सारवासारव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र तरीही अहवालावरून भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचे दिसून येते; जणू स्वतःच्या हाताने स्वतःलाच गुलाल लावण्याचे काम केल्यागत वाटते, अशा अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करा अन्यथा मोहाडी नगर विकास संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मोहाडी नगर विकास संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत तीन एप्रिलला नगरपंचायत मोहाडी येथील भ्रष्टाचार व गैरप्रकारांची चौकशीही जिल्हास्तरावर करण्यात यावी व चौकशी वेळेस तक्रारकर्त्यास बोलावण्यात यावे जेणेकरून भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे देण्यास सोयीचे होईल अशी तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर विभाग नागपूर व जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे करण्यात आली होती. सदर तक्रार मुख्याधिकारी यांच्याच विरोधात असल्याने जिल्हास्तरावर चौकशीची मागणी गेली, मात्र भ्रष्टाचाराचे पाप लाव लपवण्याकरिता मुख्याधिकारी मोहाडी यांनी स्वतःची चौकशी स्वतःच करून खोटा चौकशी अहवाल तक्रार कर्त्यास दिला. पण त्या चौकशी अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले ते पुढील प्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण कामात जेवढे सिमेंट रस्ते सिमेंट नाली बांधकाम झाले तेवढेच देयके प्रिन्सिपल गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागपूर या संस्थेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करून कंट्राट दारास देयके अदा करण्यात आले. त्याबाबत ज्या जागी सिमेंट रस्ता व नाली झाली त्याचे पुरावे मुख्याधिकारी यांनी तक्रारदारास चौकशी अहवालात दिले. दिलेल्या चौकशी अहवालात प्रभाग क्रमांक १ मधील सत्यवान डेकाटे ते गेडाम येथे सिमेंट रोड व नाली प्रत्यक्षात झालीच नाही. प्रभाग क्रमांक २ मधील यशवंत मोटघरे ते मेहबूब शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व सिमेंट नाली झाल्याचे चौकशी अहवालात म्हटले. पण प्रत्यक्षात या ठिकाणी सिमेंट नाली झालीच नाही. प्रभाग तीन मध्ये दयाराम सेलोकर ते सलीम शेख यांच्या घरा पर्यंत सिमेंट रोडवर सिमेंट नाली कव्हर सहित झाल्याचे चौकशी अहवाला दिले. पण प्रत्यक्षात या ठिकाणी सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. प्रभाग दोन मध्ये वामन श्रीपाद ते बंडू कांबळे सिमेंट रस्ता व सिमेंट नाली कव्हर सहित बांधकाम झाल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे. पण येथील सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आलेच नाही. शिवाय लीलाधर आगरे ते पुरुषोत्तम पात्रे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व सिमेंट नाली कव्हर सहित बांधकाम झाल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे पण येथील सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले नाही.
सदर सर्व माहिती मोहाडी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांनी तक्रार कर्त्यास आपल्या चौकशी अहवालात दिली. या सर्व बांधकामाचे पूर्ण द्यायचे अदा करण्यात आले आहेत असे लेखी चौकशी अहवालात नमूद केलेले आहेत. मग वरील प्रमाणे ज्या ठिकाणी सिमेंट रस्ता व सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आलेच नाही तर त्यांचे देयके कशी काय देण्यात आली? यात भ्रष्टाचार झाल्याचे दिलेल्या चौकशी अहवाला स्पष्ट झालेले आहे.
नगर विकास संघर्ष समितीने आता पुन्हा निवेदन देऊन भ्रष्टाचारात व्याप्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री विरोधी पक्ष नेते आमदार नाना पटोले यांची भेट घेऊन सबळ पुरावे सादर करण्यात येणार असल्याचे नगर विकास संघर्ष समितीने रफिक बबलू सय्यद खुशाल कोसरे पुरुषोत्तम पात्रे जगदीश निमजे अनिल न्यायखोर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. आता यावर काय कारवाई होते याकडे मोहाडी वासियांचे लक्ष लागलेले आहे.
