नकली सोने विकणाऱ्याला कोंढाळी पोलीसांनी केली अटक बाजारगाव नजिकच्या पांजरा (गो) येथील घटना
कोंढाळी-
ठाणे (मुंबई) येथील अर्जदाराच्या तक्रारी वरून कोंढाळी पोलीसांनी नकली सोन विकण्याचा प्रयत्न असलेल्या बाजारगाव लगतच्या पांजरा गोविंद येथील दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी कोंढाळी पोलीसांनी ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार ठाणे (मुंबई ) येथील सोमनाथ भगवान गिरी मु.महात्मा फुले कॉलनी गुरुनानक स्कूल जवळ उल्हासनगर ठाणे यांचे तक्रारीनुसार
कोंडळीच्या पोलिसांनी हा कोंडाळी पोलिसांकडे सोमनाथ भगवान गिरी राहणार महात्मा फुले कॉलनी गुरुनानक स्कूल जवळ उल्हासनगर जिल्हा ठाणे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ भगवान गिरी हे मागील 09 -04-2024 ला मुंबई टीम कडून कबड्डी खेळण्यासाठी नागपूरला आले होते. त्याच प्रमाणे सुरज पवार व शरद पवार हे दोन्ही खेळाडू नागपूर कडून कबड्डी स्पर्धेत भाग घेतला होता. खेळ संपल्यावर पांजरा (गोविंद) येथील सुरज पवार सोबत सोमनाथ गिरी यांचीओळख झाली . ओळख झाल्यावर सोमनाथ गिरी व सुरज पवार यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला व आपल्या आपल्या गावी परत गेले. मात्र दहा दिवसानंतर सुरज पवारने सोमनाथ गिरी यांना फोन करून सांगितले की खोदकाम करत असताना मला सोन्याचे शिक्के सापडलेले आहेत, ते सोने विकायचे आहे त्यासाठी तुमची मदत पाहिजे आहे. तुमच्याकडे कोणी ग्राहक असेल तर सांगा. खोदकामा सापडलेले सोने कमी दरात सोने कमी दरात देवु. त्यासाठी तुझी मदत हवी आहे. वाटत असल्यास सापडले सोने याची पाहणी करण्यासाठी सुरजने सोन्याच्या शिक्के व्हाट्सअप व्हिडिओ वर पाठविले ,तसेच तुला प्रत्यक्ष पाहायचे असेल तर तू प्रत्यक्ष येऊन पाहून जा असे सांगितले. यावरून 27/02/2025 ला सोमनाथ गिरी व त्यांचे मित्र राहुल देविदास आंधळे हे नागपूरला आले व नागपूर वरून थेट बाजारगाव जवळच्या पांजरा (गोविंद) येथे पोहोचले .तेथे त्यांनी सुरज चे पवार चे घर गाठले त्यानंतर सोमनाथ गिरी व त्यांचे मित्र सुरज पवार यांचे घरी पोहोचल्यावर त्यांनी सोन्याच्या शिक्के बाबद विचारले असता सोमनाथ गिरी ला विश्वासात घेण्या साठी सांगितले की तपासणी साठी हे दोन शिक्के तू घेऊन जा, दोन शिक्याचे फक्त दहा हजार रुपये मला दे. पण सोमनाथ व त्याचे मित्र यांना या प्रकरणी संशय आला.व त्यांनी नकार दिले व सोमनाथ व त्याचे मित्र परत गेले परत ठाणे मुंबईला गेले .मात्र या दरम्यान सुरज पवार चा भाऊ शरद पवार यांने सोमनाथ गिरी यांना वारंवार फोन करून स्वस्तात सोने घेऊन जा असे वारंवार फोन करत होता .यावरून सोमनाथ याला शंका आली सोमनाथ याने नागपूर पोलीस कमिशनर यांना ऑन लाईन तक्रार केली. ही तक्रार नागपूर पोलीस (ग्रा)चे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन ला या तक्रारी बाबद चौकशी चे आदेश दिले. या वरून कोंढाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी फिर्यादी बनून, आपल्या पोलीस स्टाफ चे पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र नागरे व ना पो शी मनोज आगरकर फिर्यादीनुसार त्या अर्जदाराच्या तक्रारीच्या अनुसंगे सुरज पवार व शरद पवार यांची चौकशी करण्यासाठी ते कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी आपल्या स्टाफ सह पांजरा गाठले अर्जदाराची चौकशी करण्यासाठी त्यांचे नाव सुरेश रमेश जाधव 29 व शरद रमेश जाधव राहणार पांजरा गोविंद असल्याचे निष्पन्न झाले यावरून दोन पंचा समक्ष पोलिसांनी सुरज जाधव यांचे घराचे झडती घेतली असता एका घराच्या छतावर वर झोपला असल्याचे आढळून आला.त्याला विचारले त्यांनी सुरज रमेश जाधव आपले नाव सांगितले व अधिक चौकशी केली असता सुरज जाधव जवळ निळ्या रंगाची एक बॅग आढळून आली त्या बॅगमध्ये पिवळ्या रंगाची एक बॅग होती त्यामध्ये त्या बॅगमध्ये पिवळ्या रंगाच्या एकूण 104 गोलाकार नग नाणे आढळून आले तसेच एका स्टील धातूच्या केटली मधे दोन नाणी व इतर साहित्य आढळून आले . अर्जदाराने दिलेला तक्रारीनुसार नाणे जुळत असल्याने सदरचे नाणे कोठून आणले विचारले असता सुरज जाधव यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले ते उत्तर समाधानकारक न मिळाल्याने सदर इसमाने अर्जदाराची फसवणूक केल्याचे उद्देशाने फसवणूक होत असल्याचे समजतात तपोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळाची घटनास्थळावरून चारही वस्तू जप्त करून सुरेश रमेश जाधव 29 व शरद रमेश जाधव 27 यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यावरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळेभा न्या स कलम318 (4), 62, 3(5 )गुन्ह्याची नोंद करून यात सुरेश जाधव ला अटक करून शरद जाधव चां पोलीस शोध घेतआहे . या प्रकरणी पो उ नि धवल देशमुख व स्टाफ पुढील तपास करीत आहे.
