धार्मिक सद्भावना जपणारे संत शेख महंमद’ या विषयावर प्रा.उमेश सूर्यवंशी यांचे व्याख्यान
Summary
नवी दिल्ली, दि. ४ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रा. उमेश सुर्यवंशी हे उद्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी ‘ धार्मिक सद्भावना जपणारे संत शेख महंमद’ या विषयावर ४९ वे पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी […]
नवी दिल्ली, दि. ४ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रा. उमेश सुर्यवंशी हे उद्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी ‘ धार्मिक सद्भावना जपणारे संत शेख महंमद’ या विषयावर ४९ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी प्रा. उमेश सुर्यवंशी हे दुपारी ४ वाजता व्याख्यानमालेत विचार मांडणार आहेत.
प्रा. उमेश सुर्यवंशी यांच्या विषयी
प्रा. उमेश सुर्यवंशी हे पुणे येथील सरहद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. प्रा.सुर्यवंशी हे २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय वक्तृत्व तसेच वादविवाद स्पर्धांचे विजेते आहेत. विविध विषयांवर त्यांची व्याख्याने झाली असून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे. ‘महाराष्ट्राचा महावक्ता पुरस्कार’,‘महाराष्ट्राचा युवावक्ता पुरस्कार’, ‘शरद युथ आयकॉन पुरस्कार’,‘प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार’ आदी पुरस्काराने प्रा. उमेश सुर्यवंशी यांचा सन्मान झाला आहे.
गुरुवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
गुरुवार, ५ ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/