दोन शाळेकरी मित्रांचा विहिरीत बुडून मृत्यू

दोन शाळेकरी मित्रांचा
विहिरीत बुडून मृत्यू
▪ जिवलग मित्र
एकुलते एक पुत्र ▪
▪ आई-वडिलांवर कोसळले
आभाळ ▪
▪ आर्वी शहरात शोककळा▪
क्रिकेट खेळायला जातो असे घरच्यांना सांगून विहिरीवर पोहण्याकरिता गेलेल्या दोन शाळकरी युवकांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही दुःखद घटना घडली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
देवांशू निलेश घोडमारे (14 वर्ष )राहणार असोले ले आऊट व युगंधर धर्मपाल मानकर (14 वर्ष) राहणार साईनगर आर्वी अशी मृतकांची नावे आहेत . ते येथील तपस्या इंग्लिश स्कूलच्या नवव्या वर्गाचे विद्यार्थी असून वर्ग मित्र आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास दोघांनीही घरच्यांना क्रिकेट खेळायला मैदानावर जातो . असे खोटे कारण सांगितले आणि सायकल घेऊन निघाले परस्पर ते राधाकृष्ण नगरच्या मागच्या बाजूला असलेल्या राजेश गुल्हाने यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेले . नवशिके असल्यामुळे होता पोहता पोहता च पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. तिकडे घरच्यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची वाट पाहिली आणि शोधाशोध सुरू केली . मात्र त्यांचा पत्ता लागला नाही . शेवटी निलेश घोडमारे यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली . पोलिसांनी सुद्धा तक्रार दाखल करून घेऊन शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी राजेश गुल्हाने यांच्या शेतालगत चा शेतकरी पाणी पिण्याकरिता त्या विहिरीवर गेला . तेव्हा त्याला या युवकाचे मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसले . त्याने लगेच तेथील पोलिसांना याची माहिती दिली ठाणेदार भानुदास पीदुरकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वंदना सोनवणे उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे तथा अधिनस्त कर्मचारी घटनास्थळी पोहोचले . त्यांनी मंगेश मेश्राम, वामन डेहनकर यांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनात करिता पाठविले.
जिवलग मित्र
एकुलते एक पुत्र
देवांशू घोडमारे व युगंधर मानकर ते दोघे एकाच वर्गात शिकत असल्याने जिवलग मित्र होते. सतत ते सोबत राहायचे. खेळायला सुद्धा सोबत जायचे. सर्वांसोबत मिळून-मिसळून राहत असल्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. याशिवाय देवांशू हा घोडमारे परिवारातील तरी युगंधर हा मानकर परिवारातील एकुलता एक असल्यामुळे त्यांच्या परिवारावर तर फार मोठा आघात झालाच शिवाय मित्रमंडळी वर सुद्धा शोककळा पसरली आहे .
० महेश देवशोध (राठोड)
० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी
० पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क