देसाईगंजात दहा दिवसांचा जनता कर्फ्यु. किराणा, भाजीपाला घरपोच मिळणार शहरातील संपुर्ण बाजारपेठ राहणार बंद
Summary
मंगला गिरीशसिंग चुंगडेमहिला न्युज रिपोर्टर/वडसा देसाईगंज-ता.प्र:- शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील तहसिल कार्यालयात पार पडलेल्या शहरातील व्यापारी व प्रशासकीय अधिका-यांच्या बैठकीत दि.27 सप्टेंबर पासुन 6 ऑक्टोबर 2020 पर्यंत दहा दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला […]
मंगला गिरीशसिंग चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर/वडसा
देसाईगंज-ता.प्र:-
शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील तहसिल कार्यालयात पार पडलेल्या शहरातील व्यापारी व प्रशासकीय अधिका-यांच्या बैठकीत दि.27 सप्टेंबर पासुन 6 ऑक्टोबर 2020 पर्यंत दहा दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान दहा दिवसाचा जनता कर्फ्यु पाळणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने त्या दृष्टीने सर्वांनी सहमती दर्शवुन एकमताने सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तथापि जीवनावश्यक वस्तू अभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यास्तव किराणा, भाजीपाला घरपोच सेवा देण्यात सुट देण्यात आली असुन दरम्यान कायदेभंग करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या माग॔दश॔नात घेण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्षा शालु दंडवते, उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, प्रभारी तहसीलदार दिपक गुट्टे,मुख्याधिकारी डाॅ कुलभुषण रामटेके,प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बावनकर,शहरातील व्यापारी,पञकार प्रामुख्याने उपस्थित होते