देशी दारू दुकानातुन अवैद्यरित्या विक्री व वाहतुक करणा-यावर कन्हान पोलीसांची कारवाई
*नागपूर* कन्हान : – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमा वली कडक केली असुन देशी दारू भट्टी, वाईन शाॅप व बियरबार येथुन थेट मद्य विक्रीवर बंदी करण्यात आली असुन पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत काही देशी दारू भट्टीचे दुकानातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु विक्री व वाहतुक होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पारशिवनी पोलीसांनी अश्या अवैध दारू विक्री व वाहतुक करणा-या सात आरोपी विरूध्द गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.११) मे ला गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदिपान उबाळे, पोलीस नापोशि संदीप कडु, मुदस्सर जमाल, पोशि महेंन्द्र जळीतकर, मपोशि कविता, प्रिया हयांनी आज सकाळ पासुनच पोलीस स्टेशन परिसरातील अवैध दारू विक्री व वाहतुक करणा-यावर पाळत ठेवुन अवैधरित्या देशी दारूची वाहतुक व विक्रीच्या एकुण चार प्रभावी कार्यवाई करून अवैध देशी दारू वाहतुक व विक्री करणारे आरोपी १) शुभम भगवान पाटील, २) पुंडलिक राजाराम खंडाते, ३) रविंन्द्र रमेश तवले हे तिघेही रा. पारशिवनी, ४) सुनिल दौलत गिरी ५) शिशुपाल कवडु चव्हान हे दोघही रा. पिपळा असे पाच आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्या ताब्यातील १५८ देशी दारूच्या निपा किंमत १०,८८० रुपये, दारू वाहतुकीस वापरलेले एकुण तिन दुचाकी वाहने किं. १,४०,००० रुपये असा एकुण १,५०,८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी विरुद्ध पोस्टे ला कलम ६५ (ए)८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर प्रकरणात घोगरा रोड पारशिवनी येथील जैस्वाल देशी दारू भट्टीतील मॅनेजर भैयाजी यादवराव नेवारे व सप्लायर मंगेश शेषराव नागोसे दोन्ही रा. पारशिवनी यांनी मद्य विक्री संबंधी शासनाकडुन निर्गमीत आदेशा चे उल्लंघन करून अवैधरित्या दारू विक्रेत्यांना देशी दारू विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद दोघांवर सुद्धा वरील सर्व गुन्ह्यात अटक करण्यात आली. या सर्व गुन्ह्यत जैसवाल देशी दारू भट्टी च्या मद्य विक्री परवाना रद्द करणे बाबत मां. जिल्हाअधिकारी रविंन्द्र ठाकरे साहेब नागपुर व राज्य उत्पादन शुल्क विभागा स पत्र व्यवहार करून नमुद देशी दारू भट्टी मालका विरुद्ध कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्ष क श्री राकेश ओला, उपाधिक्षक श्री राहुल माकणीकर , श्री उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग रामटेक नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक संदिपान उबाळे, सह फौजीदार दिलीप बासोडे, जयंत शेरेकर, नापोशि संदीप कडु, मुदस्सर जमाल, पोशि महेंन्द्र जळीतकर, मपोशि कविता, प्रिया आदी कर्मचा-यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535