देशात कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम राहणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना पत्र
Summary
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१ देशातील कोरोनाची परिस्थिती आणखीन नियंत्रणात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात अधिक कोरोनाबाधित […]
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१
देशातील कोरोनाची परिस्थिती आणखीन नियंत्रणात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात अधिक कोरोनाबाधित आहेत, त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयायोजना सूनिश्चित करा. कठोरपणे निर्बंध लागू केल्यामुळे दक्षिण आणि ईशान्यच्या काही भागांना सोडून संपूर्ण भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे.
देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार होत असल्याने खबरदारी म्हणून कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.