BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

देशाचे सीमेवर तैनात जवानां चे कुटुंबीयांचा सत्कार, रक्तदान , भव्य रॅली व व्याखानातून कोंढाळी त शिवजयंती साजरी १३ वर्षांच्या मुली ने —– प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

Summary

देशाचे सीमेवर तैनात जवानां चे कुटुंबीयांचा सत्कार, रक्तदान , भव्य रॅली व व्याखानातून कोंढाळी त शिवजयंती साजरी १३ वर्षांच्या मुली ने —– प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले 251 युवक युवतींनी कडूनरक्तदान जय-जय- जय भवानी-जय-जय शिवाजीची गगन भेदी शिवगर्जना – कोंढाळी- वार्ताहर जय-जय-जय […]

देशाचे सीमेवर तैनात जवानां चे कुटुंबीयांचा सत्कार, रक्तदान , भव्य रॅली व व्याखानातून कोंढाळी त शिवजयंती साजरी
१३ वर्षांच्या मुली ने —– प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

251 युवक युवतींनी कडूनरक्तदान
जय-जय- जय भवानी-जय-जय शिवाजीची गगन भेदी शिवगर्जना
– कोंढाळी- वार्ताहर
जय-जय-जय भवानी!जय-जय-जय शिवाजी-ऽऽऽ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकारांच्या प्रचंड, शिव गर्जने सह मार्दव प्रतिष्ठानतर्फे येथील हुतात्मा स्मारक परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याला प्रारंभ झाला. या प्रसंगी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा जगभर आदर केल्या जातो. महाराजांच्या शौर्य, संयम आणि उदारता ही एक विचारधारा बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ज्या पद्धतीने चालत असे, त्याचप्रमाणे ते आपल्या राज्यातील जनतेवर प्रेम करत असत. महाराजांचे प्रजेवर जितके प्रेम होते तितकेच त्यांचे कर्तव्य कठोर होते. शेतकर्यांवर तर विषेश प्रेम होते
शेतकऱ्यांच्या भाज्यांच्या देठालाही हात लावू नका. शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला माला चे योग्य भाव दिल्याशिवाय काहीही घेऊ नका, संकटकाळीशेतकर्यांना मदत करणे हे सर्वात पुण्य आहे. असा आदेशच छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता.
असे मार्गदर्शन कोंढाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी
कोंढाळी येथील हुतात्मा स्मारक येथे मार्दव प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त मार्दव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य , उपस्थित युवक व लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन व प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी देशाचे सीमेवर तैनात आरिफ शेख यांचे आई व पत्नी चा सत्कार तसे़च ग्रा पं चे कर्तव्य दक्ष कर्मचारी हेमराज खंते,(पाणीपुरवठा), मकसुद शेख (घानकचरा निर्मुलन) यांचा ही सत्कार तसेच डॉजबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम आलेला ला.भु. वि. चे महिला खेळाडू व हॅन्डबॉल मधे राज्यात द्वितीय क्र प्राप्त संघाचा उपस्थित पाहुणे मंडळींनी सत्कार करण्यात आला सोबत*छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र* या विषयावरील निबंध स्पर्धेतील 163विद्यार्थांनी भाग घेतला होता,यात प्रथम कुमारी शर्वरी विजय भादे,द्वितीय रोहित लक्षमन बावने,व तृतीय- अश्मी ललित मोहन काळबांडे यांचे सह व 10 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर पारितोषिक वितरणानंतर रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जीवन ज्योती रक्त पेढी कडून रक्त दानात ज्यामध्ये 251 तरुण-तरुणी, शिक्षक, नागरिक,कृषी,कर्मचारी यांनी रक्तदानात सहभाग घेतला.याप्रसंगी जि प सदस्या पुष्पा ताई चाफले,कोंढाळी सरपंच केशवराव धुर्वे, पंचायत समिती सदस्य लताताई धारपुरे, उपसरपंच स्वप्नील व्यास, प्राचार्य ग़णेशराव शेंबेकर, ग्रा पं सदस्य संजय राऊत, प्रमोद चाफले, विनोद माकोडे,कविता झाडे, मंडळ अधिकारी सुरज साददकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसाद पांडे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचलन-अभिजीत मानकर, तर आभार आशुतोष माकोडे यांनी केले. तसेच श्री संत गुलाबबाबा आश्रमापासून जनाश्रय- शिवाभीमान संघटनेतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.
कोंढाळी, मासोद, कामठी,जुनापाणी, चंदनपार्डी, मुर्ती, कचारी सावंगा,गावां सह येथील लाखोटीया, भुतडा कनिष्ठ महाविद्यालय , आर बी व्यास महाविद्यालय, त्रिमूर्ती हायस्कूल, तसेच ओम साई गृप कोंढाळी-वर्धा टी पॉईंट येथे ही
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करून महाप्रसाद वितरित करण्यात आली. मासोद येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रासामोरील पटांगणात
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सप्त खंजेरी वादक बाल कीर्तनकार कुमारी जान्वी सोपन घुमे या बाल किर्तनकाराने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, तसेच समाज प्रबोधनात्मक सोहळ्यात उपस्थित हजारो श्रोत्यांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *