दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Summary
दिनांक 27 जुलै 2021 ला,लॉयन्स क्लब गडचिरोली च्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत धानोरा तालुक्यातील फुलबोडी या अतीदुर्गम गावात जाऊन गरजु मुलांना शालेय बॅग तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लॉ बाळासाहेब पद्मावार यांच्या सौजन्याने त्यांचा मुलगा अनिकेत (अमेरिका) […]
दिनांक 27 जुलै 2021 ला,लॉयन्स क्लब गडचिरोली च्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत धानोरा तालुक्यातील फुलबोडी या अतीदुर्गम गावात जाऊन गरजु मुलांना शालेय बॅग तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लॉ बाळासाहेब पद्मावार यांच्या सौजन्याने त्यांचा मुलगा अनिकेत (अमेरिका) यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण हा उपक्रम दरवर्षी घेतल्या जातो.
यावर्षी सुद्धा अनिकेत यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास 60 मुलांना शालेय बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप फुलबोडी येथे करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लॉ. *परवीन भामानी,सचिव मंजुषा मोरे,* *कोषाध्यक्ष महेश बोरेवार, लॉ. सतीश पवार, लॉ. शेषराव येलेकर*, *लॉ. नादीरभाई भामानी, लॉ.* *सुरेश लडके, लॉ. गिरीश कुकडपवार, लॉ. संध्या* *येलेकर,लॉ. ममता कुकडपवार, लॉ. सुचिता* *कामडी, लॉ. स्मिता लडके, श्रीमती उसेंडी मॅडम* ,* *मुख्याधापिका आश्रमशाळा, चांदाळा तसेच फुलबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.केशरी* *पाटील हिचामी,श्री विठ्ठल पाटील करंगामी,श्री. सुरेश करंगामी,श्री.केशरी* *नैताम,श्री.विश्वनाथ परसे,श्री.कालिदास हिचामी*
*आदि मान्यवर उपस्थित* *होते.शिक्षण हे आपल्यामध्ये* *आत्मविश्वास वाढविण्यास आणि आपले व्यक्तिमत्व घडविण्यास सहायता करते.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळेतच रचला जातो असे मनोगत क्लब चे उपाध्यक्ष सतीश पवार यांनी व्यक्त केले.*
शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी