नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

दीक्षा भूमीवरील जेवणाचे स्टॉल पूर्णता बंद करावे ,

Summary

दीक्षा भूमीवरील जेवणाचे स्टॉल पूर्णता बंद करावे , 1956 पासून आपण धम्म स्वीकारला,जो धम्म मानवी प्रगतीचा पथ आहे तरीही आजपर्यंत आम्हची अन्नाचीच समस्या सुटली नाही म्हणजे बुद्ध धम्म वा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक वा स्वाभिमानी म्हणून जगण्याचे विचार कृतीत अमल केले […]

दीक्षा भूमीवरील जेवणाचे स्टॉल पूर्णता बंद करावे , 1956 पासून आपण धम्म स्वीकारला,जो धम्म मानवी प्रगतीचा पथ आहे तरीही आजपर्यंत आम्हची अन्नाचीच समस्या सुटली नाही म्हणजे बुद्ध धम्म वा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक वा स्वाभिमानी म्हणून जगण्याचे विचार कृतीत अमल केले नाही त्यामुळेच आपल्या समस्या सुटल्या नाहीत हे मात्र नक्की. स्टॉल लावणारेसुध्दा पैसा दारू दुकानदारकडून व शहरातील गर्भ श्रीमंताकडून जमा करून अर्धे आपले व अर्धे जेवण वाटपात खर्च करतात आणि बीजेपी सारखे हिंदूंवादी संत्री स्टेजवर भाषण देतात त्यांचे काय ?त्यांचेच मानसिक गुलाम तिथे जेवणाचे स्टॉल लावतात बरेच पगार कमविणारेसुद्धा फुकटच्या जेवणाचा आस्वाद घेतात व ज्यांनी कधीही डॉ.आंबेडकर तत्वज्ञान अमल केला नाही तोच हरामी आम्हला उपदेश करतो.तिथे अनेक खुराळे उभे करून अनेक संघटनामध्ये आम्ही कसे विभागलो आहोत हे येणाऱ्या जनतेला दाखवितात.दीक्षा भूमीचोर छोटेकर पैसे कमवितो ह्यावर उपाय काय? आता ही दीक्षाभूमी उरलीच नाही तो आता आरआरएस वा बीजेपीचा राजकीय मंच झालाय हे आपण समजून घ्या.तिथे अस्थिकलश आणून लोकांमध्ये केवळ अंधश्रद्धा विकसित केल्या जात आहे.जिथे दीक्षाच दिली जात नाही तर ती दीक्षा भूमि कसली..तिथे ज्यादिवशी फक्त पुस्तके दिसतील आणि जेवणाचे वा इतर खुराळे बंद होतील व एकच लाऊडस्पीकर वाजेल व समाज उत्थानात प्रत्यक्ष योगदान देणारे डॉ.आंबेडकर विचारधारावर सखोल अध्ययन करणारे वैज्ञानिक / विद्वान( लाखो रुपये डोनेशन देऊन कॉलेज व विद्यापीठात लागलेले व्यवस्थेचे गुलाम सोडून) येऊन समुपदेशन करतील तरच ती दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाईल अन्यथा ती केवळ जत्राच होईल आणि हरामी राजकीय दलाल आपल्या पोळ्या शेकत राहतील व समाज पुनःअंधश्रध्येच्या खाईत लोटला जाईल …पुनः घरवापसीच होईल असे दिसतेय! ऍड.डॉ.सत्यपाल कातकर, मनोवैज्ञानिक माजी प्राचार्य व लेखक
मो.9822722765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *