“दीक्षाभूमी”, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी ७ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल मा.SDM नागपूर शहर यांनी मा.तहसिलदार नागपूर शहर यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
Summary
“दीक्षाभूमी”, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी ७ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल मा.SDM नागपूर शहर यांनी मा.तहसिलदार नागपूर शहर यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत *मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र शासन यांच्या देवगिरी नागपूर येथील कार्यालयाने, […]
“दीक्षाभूमी”, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी ७ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल मा.SDM नागपूर शहर यांनी मा.तहसिलदार नागपूर शहर यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
*मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र शासन यांच्या देवगिरी नागपूर येथील कार्यालयाने, विनोदकुमार खोब्रागडे यांचा विनंती अर्जाची दखल घेऊन,मा.विभागीय आयुक्त नागपूर यांना निर्देश दिले होते*
*माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी मा.जिल्हाधिकारी नागपूर यांना निर्देश दिले होते,*
*मा.जिल्हाधिकारी नागपूर यांनी मा.SDM नागपूर शहर यांना निर्देश दिले होते*
*दिनांक ०२/०९/२०२४ रोजी मा.SDM नागपूर शहर यांनी मा.तहसिलदार नागपूर शहर यांना निर्देश दिले होते*
*आज, दिनांक ०६/०९/२०२४ रोजी माननीय तहसीलदार नागपूर शहर यांच्या न्यायालयात,दीक्षाभूमी, नागपूर महाराष्ट्र शासन निर्णय नुसार,भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्डवर नोंद करन्या संमधात महसूल अधिकारी मंडळ अधिकारी व तलाठी लेंढरा यांना तात्काळ अहवाल मागितला आहे*
*आयु, विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनीच अपील दाखल केली होती*
*कर्तव्यात कसूर केल्यामुळे महसूल अधिकारी विरुद्ध लवकरच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे फौजदारी पीटिशन दाखल करनार असुन,दीक्षाभूमी, नागपूर व चंद्रपूर दोन्ही सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी जनहित याचिका सुद्धा दाखल करनार आहे*
*मौजा लेंढरा येथील तलाठी श्री.अजय चव्हाण यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे,जास्त हुशारी करु नये, तसेच इतर तलाठ्याने सुद्धा जेवढे कर्तव्य खंड चार मध्ये दिले आहे त्याप्रमाणेच काम करावे, शेकवून घेऊ नये,*
*ज्याअर्थी “दीक्षाभूमी,” नागपूर आहे, तीच जमीन मागील ७० वर्षांपासून दीक्षाभूमी च्या नावाने सरकारी रेकॉर्ड वर नावानेच नाही,*
*त्याअर्थी सुद्धा महाराष्ट्र शासन शेकडो करोडो रुपयांचा निधी दीक्षाभूमी विकासासाठी देत आहे, तेव्हा पदाधिकारी व समाजाचे कर्तव्य नाही काय दीक्षाभूमी,नागपूर व दीक्षाभुमी ,चंद्रपूर मालकी हक्काने नावाने करणे*
*मी, संकल्प करतो की, दीक्षाभुमी, नागपूर व दीक्षाभुमी चंद्रपूर, दोन्ही राष्ट्रीय स्मारक,सरकारी रेकॉर्डवर, आखीव पत्रिका मध्ये अखेरपर्यंत नावाने करनारच*
*चाहें सुप्रीम कोर्टात दिल्लीत स्पेशल लिव्ह पीटिशन दाखल करन्याची वेळ आली तरीही मी सुप्रीम न्यायालयात ज्यान्यास सक्षम आहे*
*यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासन,प्रशासन, व कंपन्या यांच्या ब्रॅण्ड सुप्रीम न्यायालयात स्पेशल लिव्ह पीटिशन दाखल करुन सळोकीपळो करुन न्याय मिळवून घेतला आहे*
*लोक भितात, बोलत नाही म्हणून अन्याय अत्याचार होतात असे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात*
*एक लक्षात घ्या, दीक्षाभूमी ही कोट्यवधी बौद्ध बांधवांची धम्म भुमी आहे, उर्जा भुमी आहे, क्रांती भुमी आहे, प्रेरणा भुमी आहे,व त्या दीक्षाभूमीचे संरक्षण करणे प्रत्येक बौद्ध नागरीकांचे कर्तव्य आहे*
*दिनांक ३१/०५/१९६१ मध्ये महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने परिपत्रक काढले,मा.विभागीय आयुक्त नागपूर यांना निर्देश दिले, तेव्हा ७० वर्षांपासून महसूल अधिकारी नागपूर यांनी दीक्षाभूमी, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड का केले नाही?????*
*या विषयावर दिनांक ०६/०९/२०२४ रोजी महसूल अधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात सुनावणी आहे*
*दीक्षाभूमी, चंद्रपूर प्रकरणात, आरोपी अवर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, प्रज्ञा वि.देशमुख ,सह आयुक्त समाजकल्याण पुणे,व इतर २५ आरोपी विरुद्ध फौजदारी पीटिशन आज न्यायालयात शपथपत्र सह आँनलाईन दस्तऐवज पुराव्यानिशी दाखल झाली*
*यापूर्वी दीक्षाभुमी, नागपूर प्रकरणात आरोपी विभागीय आयुक्त नागपूर सह २२ आरोपी विरुद्ध फौजदारी पीटिशन दाखल केली असून दिनांक ०९/०९/२०२४ला आदेशाकरीता आहे,*
*आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथील २५ आरोपी विरुद्ध फौजदारी पीटिशन न्यायालयात आँनलाईन दस्तऐवज पुराव्यानिशी दाखल झाली आहे*
*ज्याअर्थी दीक्षाभूमी, चंद्रपूर ही मागील ७० वर्षापासुन आजपर्यंत आखीव पत्रिका क्रमांक ९६ मध्ये नावानेच नाही, तसेच खसरा नंबर २/४मध्ये सुद्धा दीक्षाभूमी नावाने नाही*
*ज्याअर्थी सिव्हिल लाईन खसरा नंबर २/४ चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर (जिवतोडे) यांच्या नावाने ७/१२फेरफार क्रमांक ११६१९दिनांक १६/१२/ २०२१ मध्ये तयार होते व झाला आहे*
*त्याअर्थी दीक्षाभूमी ,चंद्रपूर या नावाने सिव्हील लाईन खसरा नंबर २/४ मध्ये ७० वर्षांपासून नावाने का केले नाही,व का झाला नाही?????*
*ज्याअर्थी, दीक्षाभूमी चंद्रपूर व दीक्षाभुमी नागपूर येथे दरवर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिवस, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिनानिमित्त,लाखो अनुयायी दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर येथे येतात, विविध कार्यक्रम होतात,देश विदेशातुन मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात, तेव्हा तिथे साधे सुलभ शौचालय नाही , तसेच त्या ठिकाणी निवास नाही, भोजन व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाही, परिवहन आधी सुविधा नाहीत, त्यामुळे आंबेडकरी अनुयायी, यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे, करीता शासन दीक्षाभूमी विकासासाठी शेकडो करोडो रुपयांचा निधी देत असते, मात्र त्या निधीचा गैरवापर, अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर चे पदाधिकारी व महसूल चे अधिकारी ७० वर्षात सुविधा उपलब्ध करून देऊ शकले नाही,साधे सुलभ शौचालय अनुयायी यांना देऊ शकले नाही,ही शोकांतिका आहे*
*बाकीच्या सोई, सभामंडप,व इतर वेगळ्याच राहीले*
*त्याअर्थी महाराष्ट्र शासनाकडून शेकडो करोडो रुपयांचा निधी दरवर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर व दीक्षाभुमी नागपूर चां विकासासाठी दिलेला आहे , अखेर तो निधी जातो कुठे??????*
*एक लक्षात घ्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ची आहे????,*
*की,दीक्षाभुमी, चंद्रपूर ची आहे?????*
*त्याचप्रमाणे दीक्षाभूमी, नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर हे सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर काॅलेज ची आहे?????, की दीक्षाभूमी, नागपूर ची आहे?????*
*सदर दोन्ही समिती काॅलेज ची व दीक्षाभुमी कशी काय असु शकते??????*
*दीक्षाभुमी नागपूर व दीक्षाभुमी चंद्रपूर हे २४तास धम्माचे प्रचार व प्रसार करनारे केंद्र बिंदू असायला पाहिजे होते,तज्ञ भंतेजी यांची फौज तयार होणारे केंद्र असायला पाहिजे होते,*
*आणि काॅलेज साठी दुसरीकडे समितीने जागा घ्यायला पाहिजे होते*
*दीक्षाभुमी, नागपूर व चंद्रपूर चां विकासाकरिता महाराष्ट्र शासन शेकडो करोडो रुपयांचा निधी, पदाधिकारी, काॅलेजचा व स्वतःच्या विकासासाठी वापर करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे*
*ज्याअर्थी दीक्षाभुमी, चंद्रपूर हे नावच सरकारी रेकॉर्डला आखीव पत्रिका मध्ये नाही , त्याअर्थी ५६,९०,६८,४५३/- करोड रुपयांचा निधी चंद्रपूर आमदारांनी दीक्षाभूमी चंद्रपूर चां विकासाकरिता आनलाच कसा??,व महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलाच कसा???*
*या निधीमध्ये, आमदार खासदार,मंत्री,आणि इतर अधिकारी, व डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चे पदाधिकारी यांच्या किती वाटा आहे?*
*यांची संपूर्ण ज्युडीशिअल मार्फत चौकशी करावी, तसेच CBI,ED ,ACB, SIT, तर्फे चौकशी करावी अशी मागणी विनोदकुमार खोब्रागडे यांनी फौजदारी पीटिशन मध्ये केली आहे*
*फौजदारी पीटिशन मध्ये दाखल आरोपीचीं नावे आँनलाईन पाहु शकता, एकाच घरातील पाच व्यक्ती अरुण गोकुल घोटेकर अध्यक्ष,भाऊ उपाध्यक्ष, एक मुलगा सचिव, पत्नी सदस्य,दुसरा मुलगा सदस्य कसे??*
*या सर्व प्रकरणाची ज्युडीशिअल चौकशी करावी अशी मागणी विनोदकुमार खोब्रागडे यांनी फौजदारी पीटिशन मध्ये केली आहे*
*उघडा डोळे बघा नीट*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
देशहितासाठी
राष्ट्रबांधनीसाठी
आपला अनुयायी
आयु.विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१