*दीक्षाभुमी, चंद्रपूर प्रकरणात , कर्तव्यात कसूर केल्यामुळे,अवर सचिव प्रज्ञा देशमुख मंत्रालय मुंबई सह अध्यक्ष अरुण गोकुळ घोटेकर सह,२५ आरोपीवर फौजदारी खटला दाखल*
Summary
*दीक्षाभुमी, चंद्रपूर प्रकरणात , कर्तव्यात कसूर केल्यामुळे,अवर सचिव प्रज्ञा देशमुख मंत्रालय मुंबई सह अध्यक्ष अरुण गोकुळ घोटेकर सह,२५ आरोपीवर फौजदारी खटला दाखल* *फिर्यादी:-विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक हेच आहेत* *✍️दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे मागील […]
*दीक्षाभुमी, चंद्रपूर प्रकरणात , कर्तव्यात कसूर केल्यामुळे,अवर सचिव प्रज्ञा देशमुख मंत्रालय मुंबई सह अध्यक्ष अरुण गोकुळ घोटेकर सह,२५ आरोपीवर फौजदारी खटला दाखल*
*फिर्यादी:-विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक हेच आहेत*
*✍️दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे मागील ७० वर्षापासुन अनुयायी करीता साधे एक सुलभ शौचालय सुद्धा उपलब्ध करुन शकले नाही, अखेर दीक्षाभुमी, विकासासाठी जनतेने दिलेले धम्मदाण,व शासनाने दिलेला निधी जातो कुठे???????*
*दीक्षाभुमी, चंद्रपूर या नावाने, मागील ७० वर्षांपासून खसरा नंबर २/४ मध्ये व आखीव पत्रिका क्रमांक ९६ मध्ये सरकारी रेकॉर्ड वर भोगवटदार म्हणून मालकी हक्काने दीक्षाभूमी ,हे नाव का चढविले नाही??????*
*ज्याअर्थी दीक्षाभूमी, चंद्रपूर मालकी हक्काने नावानेच नाही, त्याअर्थी महाराष्ट्र शासनाकडून दिनांक २/८/२०२४ रोजी ५८ करोडो रुपयांचा निधी दीक्षाभूमी चंद्रपूर विकासासाठी कशाचा आधारे दिला??????*
*ज्याअर्थी चांदा रै.खसरा क्रमांक २/४ मध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळ (श्रीहरी बळीराम जिवतोडे) यांच्या नावाने १०० एकराचा ७/१२ दिनांक १६/१२/२०२१ मध्ये फेरफार क्रमांक ११६१९ नुसार नोंद महसूल अधिकारी यांनी केली आहे व झाली आहे*
*त्याअर्थी त्याच चांदा रै.येथील खसरा नंबर २/४ मध्ये दीक्षाभूमी, चंद्रपूर या नावाने १८२०९.००चौ.मीटर अर्थात ११ एकर जागेमध्ये नोंद मागील ७० वर्षांपासून नावाने महसूल अधिकारी चंद्रपूर व भुमापन अधिकारी चंद्रपूर व अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर चे पदाधिकारी यांनी का केली नाही,???????*
*एकाच घरचे पाच पदाधिकारी, अरुण गोकुळ घोटेकर अध्यक्ष,भाऊ अशोक गोकुळ घोटेकर उपाध्यक्ष, मुलगा कुणाल घोटेकर सहसचिव, पत्नी रुपाताई अरुण घोटेकर सदस्य,व दुसरा मुलगा राहुल अरुण घोटेकर सदस्य, एकाच कुटुंबातील पाच लोक कसे काय, लोकशाही आहे की नाही????*
*बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक परिश्रमाने,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक १६/ऑक्टोबंर/१९५६ रोजी चंद्रपूर येथे, लाखो अनुयायी यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती, तेव्हापासून दीक्षाभूमी, चंद्रपूर ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात,भारतात, प्रसिद्ध आहे*
*महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधीतून दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर विकासासाठी निधी न देता,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कडून, दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर विकासासाठी निधी देत असुन त्याचा गैरवापर मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे,या सर्व प्रकरणाची न्यायालयीन ज्युडीशिअल मार्फत सखोल चौकशी करावी व फौजदारी कारवाई करावी अशी पीटिशन दाखल केली आहे*
*पुढील सुनावणी दिनांक १७/१०/२०२४ ला ठेवली असुन मी दिनांक १९/०९/२०२४ लाच बोर्डावर प्रकरण घेन्यासाठी अर्ज दाखल करनार आहे*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही*
*जे चुकीचे आहे त्याला चुक म्हटलेच पाहिजे मग कुनीही असु द्या*
*आम्हचा विरोध दीक्षाभूमी, चंद्रपूर व नागपूर विकासासाठी मुळीच नाही, मात्र ७० वर्षांपासून दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर दोन्ही सरकारी रेकॉर्ड वर नावानेच नाही,त्यांचे काय??????*
*या प्रश्नाचे उत्तर मला मागील एक वर्षापासून शासन, प्रशासन, महसूल अधिकारी, भुमापन अधिकारी, व सोसायटीचे पदाधिकारी का देत नाही????*
*म्हणूनच मला न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल करावी लागली*
*लोक बोलत नाही म्हणून त्यांचावर अन्याय अत्याचार होतात असे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाज बांधवांनी २४तास जागृत राहावे धन्यवाद*
*अपीलार्थी*
*संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*