BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला 2022 चा बँको पतसंस्था ब्लू रिबन पुरस्कार

Summary

दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली ची ” 2022 चा बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी निवड” झाली असून सदर पुरस्कार 16 मार्च 2023 रोजी महाबळेश्वर येथे सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित “बँको ऍडव्हान्टेज सहकार परिषद 2023” मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. […]

दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली ची ” 2022 चा बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी निवड” झाली असून सदर पुरस्कार 16 मार्च 2023 रोजी महाबळेश्वर येथे सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित “बँको ऍडव्हान्टेज सहकार परिषद 2023” मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रा ला बळकटी आणणाऱ्या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी उत्कृष्ट पतसंस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातील विविध सहकारी पतसंस्था कडून ठरविलेल्या मापदंड नुसार प्रस्ताव मागितले जातात, या प्रस्तावां चे परीक्षण करून तज्ञ परीक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार स्पर्धेतील पतसंस्थेची ब्लू रिबन पुरस्कारासाठी निवड केली जाते.
गडचिरोली सारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आर्थिक दृष्ट्या भक्कम, ठेवींना संपूर्ण संरक्षण, ग्राहकांचा प्रचंड विश्वास आणि सहकार खात्याच्या प्रत्येक निकषात तंतोतंत बसणारी देि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अतिशय विश्वसनीय पतसंस्था म्हणून तिची ख्याती आहे. या पतसंस्थेची 2022 च्या बँक पतसंस्था ब्लू रिबन पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातून पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या
गडचिरोली, जिल्हा कॉम्प्लेक्स, चामोर्शी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, धानोरा, आरमोरी व कुरखेडा अशा ९ शाखा असून या शाखांशी जूडलेले सर्व सदस्य, सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक, ठेव अभिकर्ता, शाखा व्यवस्थापक,कर्मचारी व संस्थेचे संचालक मंडळातील सर्व सदस्य यांच्या परस्पर सहकार्यामुळेच हे यश गाठता आल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री , उपाध्यक्ष श्रीमती सुमतीताई मुनघाटे व मानद सचिव श्रीमती सुलोचनाताई वाघरे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *