दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सरसावला तुमसरचा ‘सागर’

पोलिस योद्धा वृत्त संकलन
तुमसर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शालिनीताई मेघे हॉस्पिटल व साधू वासवानी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तुमसर तालुक्यातील ३७ दिव्यांग बांधवांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव मिळवुन देण्यासाठी अंपग बांधवांच्या मदतीसाठी तुमसरचा सागर सरसावला आहे. सदर अवयव नोंदणीचा कार्यक्रम शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे नुकताच पार पडला.
तुमसर – मोहाडी विधान सभेचे आ. राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांनी हा उपक्रम राबविला. या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांचे शिबीर घेऊन त्यांना बसवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कृत्रिम अवयवांचे
मोजमाप घेण्यातआले. याअवयवांचे वाटप दिव्यांग बांधवांना ३५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. यावेळी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित, जगभरातील प्रशंसित उपकरणे वापरून बनवलेले आणि रुपये ४० हजारांपेक्षा अधिक बाजार मूल्य असणारे कृत्रिम मोड्युलर पाय, हात व कॅलिपर दिव्यांग बांधवांना पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे आले. अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य होत नाही, ही बाबलक्षात घेत साधू वासवानी मिशन
पुणे, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जून २०२५ रोजी मोफत कृत्रिम हात पाय, कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ३७ लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून हात पायांचे माप घेण्यात आली होती. दुर्घटनेत हात पाय गमावणारे, मधुमेहाने त्रस्त, रक्तवाहिनींच्या
विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीन झालेल्या व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगण्यात असमर्थ असतात. अशा व्यक्ती कृत्रिम हात पायांच्या सहाय्याने सामान्य जीवन जगू शकतात. सर्वसामान्यांप्रमाणे चालू -फिरू शकतात. सर्व कामकाज करू शकतात. एवढेच नव्हेतर सायकल, रिक्षा चालवू शकतात. इंजि. सागर गभणे यांच्या पुढाकाराने या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळाली असून शेकडो अपंग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. तर दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी उभारी देणारे जीवनदायी पाऊल असून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा नवा किरण दाखवणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचे इंजी. सागर गभने यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. (ता.प्र.)