महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

Summary

मुंबई, दि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडला. दिवंगत सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत उद्योगपती रतन नवल टाटा, माजी सदस्य तथा माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड, माजी सदस्य तथा माजी मंत्री रोहिदास […]

मुंबई, दि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडला. दिवंगत सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत उद्योगपती रतन नवल टाटा, माजी सदस्य तथा माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड, माजी सदस्य तथा माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील, माजी सदस्य तथा माजी राज्यमंत्री बाबा झियाउद्दीन सिद्दीकी, लोकसभा सदस्य व माजी वि.स.स. वसंतराव बळवंतराव चव्हाण, माजी वि.स.स. ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, निवृत्ती विठ्ठलराव उगले, रामकृष्ण रघुनाथ पाटील, उल्हास नथोबा काळोखे, अर्जुनसिंग पिरसिंग वळवी, हरीराम आत्मारामजी वरखडे, सिताराम भिकाजी दळवी, विजय ऊर्फ आप्पा दत्तात्रय साळवी व हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव सादर करण्यात आला.

दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *