हेडलाइन

दिल्ली महाअधिवेशन निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक 

Summary

दिल्ली महाअधिवेशन निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक   7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.यानिमित्ताने […]

दिल्ली महाअधिवेशन निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक

 

7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.यानिमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोली ची नियोजन सभा अमोल ट्युशन क्लासेस सभागृह गडचिरोली येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर,उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा संघटक चंद्रकांत शिवणकर, प्रमुख मार्गदर्शक दादाजी चापले, शालिग्राम विधाते , पांडुरंग नागपुरे , सदस्य राजेंद्र उरकुडे, पी.पी मस्के, अरुण पत्रे, भास्कर नागपुरे, त्र्यंबक करोडकर, सुनील दिवसे, ललिता मस्के, रमेश पत्रे, विजय गिरसावडे, शरद ब्राह्मणवाडे, संध्या शिवणकर, पुष्पा धंदरे, भास्कर नागपुरे, दत्तात्रय चटप, लालाजी भोयर आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अधिवेशनसाठी गडचिरोली जिल्ह्यातून दोनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार तसेच महाअधिवेशनात खालील प्रमुख मागण्यावर चर्चा होणार असल्याचे प्रा. शेषराव येलेकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी यांनी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात विविध सूचना, नियोजन व मार्गदर्शन केले.

ओबीसींच्या प्रमुख मागण्या:-

१) ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.२) केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, ३) कलम 243(T) व 243(D) सेक्शन 6 मध्ये बदल करून ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यात 27% आरक्षण देण्यात यावे ४) नॉन क्रिमिलियर उत्पन्न मर्यादित वाढ करणे ५) प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू करण्यात यावे ६) ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप देण्यात यावी ७) ओबीसी शेतकऱ्यांना 100% सबसिडी वर योजना लाग़ू करण्यात याव्या. ८) ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे ९) राज्याच्या व केंद्राच्या इतर मागण्या मंजूर करून घेणे इत्यादी बाबींवर अधिवेशनात मंथन होणार आहे. या महा अधिवेशनात खालील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे

प्रमुख अतिथी :-

या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष जस्टीस ईश्वरया, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त सिरसागर, खासदार गणेश सिंग, खासदार वड्डीराजू रवींद्र, खासदार बड्डुला यादव, खासदार राम मोहन नायडू, खासदार राम चंद्रा जागरा, खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार रामदार तडस, खासदार सुशील मोदी, खासदार विलसन, माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. के. लक्ष्मण, खासदार भारत मार्गणी, खासदार मिसा भारती,माजी खाजदार राजकुमार सैनी, आमदार किसन कातोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार ,आमदार भाई जयंत पाटील,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार रामकुमारी ढिल्लोन, आमदार परिणय फुके, माजी मंत्री संजय कुंटे यांच्यासह इतरही मान्यवरांना निमंत्रित केले आहे. या

अधिवेशनात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला देशभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे,उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर,सहसचिव शरद वानखेडे, शकील पटेल, युवा अध्यक्ष सुभाष घाटे,महिला महासंघाच्या कल्पना मानकर ,विजया धोटे, कर्मचारी महासंघाचे श्याम लेडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, विभागीय अध्यक्ष प्रदीप वादाफळे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, महिला शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता नवघडे, युवा जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *