दिलीप छांगानी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
Summary
अर्जुनी मोर:- सरस्वती विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप चंपालाल छागांणी हे 1 एप्रिल 2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त त्यांचा अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्था,सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फ सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा होते. यावेळी […]
अर्जुनी मोर:- सरस्वती विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप चंपालाल छागांणी हे 1 एप्रिल 2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त त्यांचा अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्था,सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फ सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया, संस्थेचे सचिव सर्वेश भुतडा,प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,माजी शिक्षक वर्ग, कार्यरत शिक्षक वर्ग व दिलीप छांगाणी यांचे सुपुत्र दर्शन छागांणी,शाम छांगानी तसेच त्यांचे पुत्रवधू व त्यांच्या परिवारातील सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. सेवानिवृत्ती सत्कारानिमित्त दर्शन छांगाणी यांचा त्यांच्या सपत्नीक शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह तसेच भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. दिलीप छांगानी हे सरस्वती विद्यालयात 1986 पासून कनिष्ठ लिपिक तर 1991 पासून पदोन्नती होऊन वरिष्ठ लिपिक या पदावर रुजू झाले. तेव्हापासून आजतागायत 39 वर्ष सेवा दिली. सत्कारमूर्तींचा नियोजनबद्ध कार्याचा अतिशय थाटामाटात हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया, संस्था सचिव सर्वेश भुतडा, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,माजी शिक्षक यासह कार्यरत शिक्षकांनी दिलीप छांगाणी यांच्या सेवाकार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला व भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार दिपाली कोट्टेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.
