‘दिलखुलास’ कार्यक्रमात संजय आवटे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लेखक, संपादक संजय आवटे यांची वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर, शनिवार दि. 15 ऑक्टोबर आणि रविवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत लेखक संजय आवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वाचन संस्कृतीबाबत विस्तृत मांडणी केली आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पोषक वातावरण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.