BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

दिनांक 08.03.205 रोजी ग्रा.प.वायगाव मो. ता.चंद्रपुर जागतिक महिला दिनानिमीत्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

Summary

दिनांक 08.03.205 रोजी ग्रा.प.वायगाव मो. ता.चंद्रपुर जागतिक महिला दिनानिमीत्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत/क्षेत्राबाहेरील) योजना,जि.प.स्वनिधि योजनांचे मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामपंचायत वायगाव मो.व कृषि विभाग पं.स.चंद्रपुर चे वतीने आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता श्रीमती संगिता भांगरे,गट […]

दिनांक 08.03.205 रोजी ग्रा.प.वायगाव मो. ता.चंद्रपुर जागतिक महिला दिनानिमीत्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत/क्षेत्राबाहेरील) योजना,जि.प.स्वनिधि योजनांचे मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामपंचायत वायगाव मो.व कृषि विभाग पं.स.चंद्रपुर चे वतीने आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाकरीता श्रीमती संगिता भांगरे,गट विकास अधिकारी,श्री.गणेश चव्हान,सहा.गट विकास अधिकारी,श्री दिनेश आत्राम,प्रशासक ग्रा.प.वायगाव मो.तथा कृषि अधिकारी, श्रीमती मिनाक्षी बन्सोड,विस्तार अधिकारी (पंचायत),श्रीमती आर्शीया शेख,स्वच्छ भारत मिशन ,श्रीमती साखरकर,मुख्याध्यापिका जि.प.प्राथ.शाळा. वायगाव मो,श्री.उमाजी सुर्तीकर माजी सरपंच,वायगाव मो.प्रामुख्याने उपस्थीत होते.
सर्वप्रथम राजमाता जिजाउु व क्रांतीज्योती सावित्री फुले यांचे प्रतिमेस मालापर्ण व दिपप्रजव्लन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात गट विकास अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी (पंचायत),मुख्याध्यापिका यांनी जागतीक महिला दिनानिमीत्य उपस्थीतांना संबोधित केले.तसंच दिनेश आत्राम कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत/क्षेत्राबाहेरील) योजना,जि.प.स्वनिधि योजनांचे मार्गदर्शन केले.
जागतिक महीला दिनानिमीत्य ज्या महिलांनी गावाच्या विकासाकरीता उत्कृष्ट कार्य केले अशा महिलांचा सत्कार मोमेंटो व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच MSCIT परीक्षेत ज्या ग्रामीन भागातील विदयार्थ्यांनी प्राविण्य मिळविले अशा विदयार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमीत्य अंगणवाडी व जि.प.शाळेतील विदयार्थ्यांनी नृत्य व गायण सादर केले.तसेच महिलांनी सुदधा विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धेमध्ये भाग घेवुन कलागुणांचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या महीला व विदयार्थ्यांचा विविध पुरस्कार व रोख बक्षीसे देवुन श्री.दिनेश आत्राम प्रशासक ग्रा.प.वायगाव मो.तथा कृषि अधिकारी व श्री.राजेश तुरे,ग्रामपंचायत अधिकारी यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती गौतमा रायपुरे व आभार प्रदर्शन सुनंदा पेंदराम यांनी केले.सदर कार्यक्रमाकरीता श्री.किशोर पुसाम परीचर,पाणीपुरवठा कर्मचारी व बचत गटातील महिला यांनी मोलाचा हातभार लावला.
दिनांक-08.03.2025

कृषि अधिकारी
पंचायत समिती,चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *