दिनांक ०४-०७-२०२४ रोजी झालेल्या पगारवाढ बैठकीचा वृत्तांत व दिनांक ९ जुलै संपाची तयारी …
Summary
मा.सौ.सुजाता सौनिक मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन, मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा), तिनही वीज कंपन्यांचे मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते,अधिकारी संयुक्त कृती समितीची (दोन्ही कृती समिती) बैठक झाली.या बैठकी मध्ये शासन व प्रशासनातर्फे या पूर्वीच मांडण्यात […]
मा.सौ.सुजाता सौनिक मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन, मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा), तिनही वीज कंपन्यांचे मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते,अधिकारी संयुक्त कृती समितीची (दोन्ही कृती समिती) बैठक झाली.या बैठकी मध्ये शासन व प्रशासनातर्फे या पूर्वीच मांडण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून बेसिक मध्ये फक्त १५ टक्के वाढ व अलाउन्स मध्ये १००% वाढ असा प्रस्ताव मांडण्यात आला.या बाबत आपले मत मांडताना मा. ऊर्जा सचिव (ऊर्जा) यांनी तडजोड म्हणून फारफार तर अजुन ४०/५० कोटी वाढवून देता येईल असे सांगितले.परंतु सर्वच संघटनांनी याबाबत विरोध व्यक्त करताना,हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले. तद्नंतर,अनेक संघटना प्रतिनिधींनी आपापली मते मांडली.बेसिक वरील वाढ व्यतिरिक्त,फील्ड वरील तांत्रिक कर्मचाऱ्यांना यांना आतापर्यंत रू. ५००/- असा अडोक म्हणुन जे पैसै दिले जातात, त्याऐवजी रू. १०००/- अडोक मध्ये वाढ देण्यात येईल व त्यांच्या इतर महत्वाच्या विषयांवर वेगळी बैठक आयोजित करण्यात यावी,असे सुचविले.परंतु महत्वाचे म्हणजे बेसिक मधील वाढ बाबत मात्र शासन पुढे जात नसल्याने आपल्या सहा संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक ०९.०७.
२०२४ पुर्वी बेसिक मध्ये २० ते २२.५ टक्के वाढ दिल्यास,आम्ही मान्य करू अन्यथा आपले चालु असलेले आंदोलन दिलेल्या नोटीस नुसार चालुच राहील हे सर्व अधिकारी वर्गासमक्ष सांगण्यात आले.
त्यानंतर सौ.सुजाता सौनिक मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व बैठक संपली.
त्यामुळं आपला संप अटळ आहे.या पार्श्भूमीवर उद्या दिनांक ०५.०७.२०२४ व सोमवारी दिनांक ०८.०७.२०२४ रोजी सर्वांनी परिमंडळ/ पॉवर स्टेशन ठिकाणी जोरदार गेट मीटिंग घ्यावयाच्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी संप व गेट मीटिंग साठी जोरदार तयारी करा.
