दिघोरी मोठी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांचे जनतेला शांततेचे आव्हान

लाखांदूर:- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी /मोठी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी जाहीर आव्हान केली कि, कोणत्याही जाती विषयक, धर्मा विषयक, धार्मिक भावना दुखावणारे वाॅटसापवर फोटो किंवा स्टेट्स आपल्या वाॅटसापवर ठेऊ नये, आपणाकडून असे आढळल्यास आपणावर कठोर कारवाई केल्या जाईल. भंडारा सायबर सेल कडून करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे गैरक्रुत्ते करण्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. आपण सर्वप्रथम भारतीय नागरिक आहोत याची जाणीव ठेवा, कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीसांना सहकार्य करा. असे विडियो च्या माध्यमातून सर्व जनतेला जाहीर आव्हान केले आहे.