BREAKING NEWS:
क्रीड़ा नागपुर मनोरंजन महाराष्ट्र हेडलाइन

दिग्रस (बु) शंकर पटात मध्य प्रदेशसह लगतच्या राज्यामधील बैल जोड्यांचाही सहभाग, महिला धुरकरी सहभागी होणार एकूण ११लाखांचे रोख बक्षिसे बक्षीस वितरण समारंभाला हास्य अभिनेता आशिष पवार ची उपस्थिती

Summary

काटोल -प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे काटोल शहरालग दिग्रस (बु) येथील खुल्या मैदानावर भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राज्यासह लगतचे राज्यात पुरस्काराने सन्मानित बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्या आहेत. शंकर पटानिमित्त दिग्रस बु सहलगतच्या अनेक गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. […]

काटोल -प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे

काटोल शहरालग दिग्रस (बु) येथील खुल्या मैदानावर भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राज्यासह लगतचे राज्यात पुरस्काराने सन्मानित बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्या आहेत. शंकर पटानिमित्त दिग्रस बु सहलगतच्या अनेक गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. यंदाच्या शंकरपटात मध्य प्रदेश अन् गुजरातमधील बैलांचाही समावेश असल्यानं हा शंकर पट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे.

राज्याच्या उपराजधानीच्या काटोल तालुक्यातील दिग्रस (बु)येथे दिग्रस बु ग्रामस्थ मंडळ शंकरपट आयोजन समिती चे वतीने
मनोज(भैय्या)खळतकर व मित्र परिवाराच्या सहयोगातून चार, पाच व सहा मार्च २०२४ पर्यंत *जल्लोष बळीराजा* चा संकल्पनेतून एक लाख ते एक हजार असे ३५पेक्षा ज्यास्त एकूण ११लाखांचे रोख बक्षीस व मानचिन्ह या शंकरपटातील बैलजोडी व धुरकरी यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे आहे. दिग्रस बु येथील शंकरपटा निमित्ताने भव्य मैदानावर शंकरपटात सहभाग नोंदवणारे बैलांसह शेतकऱ्यांची जणू यात्रा भरलीय असंच वाटतंय. शंकरपटात एकमेव महिला धुरकरी असणाऱ्या सीमा पाटील यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सीमा पाटील या गेल्या 35 वर्षांपासून शंकरपटात सहभागच घेत जिंकूनही येतात. त्यामुळं त्यांचं कौतुक केलं जात आहे.

थरार आणि आनंद : आपल्या रुबाबदार बैल जोड्या घेऊन धुरकरी त्यांना शर्यतीत अतिशय वेगात पळवतो. त्यावेळी शंकरपट पाहणाऱ्यांचा प्रचंड आवाज शंकरपटाच्या परिसरात गुंजनार आहे. निश्चित टार्गेट पूर्ण केल्यावरदेखील प्रचंड वेगात धावत असलेल्या बैलांना मोठ्या मुश्किलीनं थांबवण्याचा प्रयत्न धूरकरी करतात. हा संपूर्ण प्रसंग अतिशय थरारक असून धावत सुटणाऱ्या बैलांचा थरार पाहण्याचा आनंद नागरिक घेत आहेत.

सीमा पाटील एकमेव महिला धुरकरी : दिग्रस बु येथे आयोजित खास शंकरपटात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सीमा पाटील व लक्ष्मी सोनबावने या दोन महिला धूरकरी सहभागी झाल्या आहेत. सीमापाटील ह्या मागील 35 वर्षांपासून महिला धुरकरी म्हणून शंकरपटात सहभागी होत आहेत. आतापर्यंत त्यांना ४०चे वर पारितोषिक मिळाले आहेत. अशी माहिती
दिग्रस बु येथील ग्रामस्थांचे वतीने व मनोज भैय्या खळतकर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा :
विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. बाराही महिने शेतकरी कष्ट करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशानं आम्ही तिवसा येथे शंकरपटाचं आयोजन केलंय. हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोहळा आहे. या सोहळ्यात काटोल नरखेड सह लगतच्या तालुक्यातील आणि लगतच्या गावातील दोन लाखांहून अधिक शेतकरी सहभाग नोंदविणार याचा आम्हाला आनंद असल्याचं शंकर पटाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष असलेले ना.डि.से.को.को आप बैंक चे माजी संचालक अशोकराव खराडे यांनी सांगितले.तसेच माजी सरपंच व आयोजन समिती चे कार्याध्यक्ष प्रशांत मानकर यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख उत्तमराव कापसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे तालुका अध्यक्ष दिपक मोहिते, माजी उपसभापती अनूप खराडे, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक रेवतकर, अंगदजी भैसवार, विजय ताटे, शेषेराव काळे, संभाजीराव खळतकर , जयसिंगराव ढवळे, राजेश्वर राव बारई ,कोषकराव गुंड, संजय खडतर,निशांत खळतकर ,राहूल मानकर,भागवत काकडे सह अनेक ‌शंकरपट प्रेमी या प्रसंगी उपस्थित होते. चार मार्च रोजी दिग्रस बु गाव गाटातील कृष्णा व कॅप्टन या जोडीने शंकरपटाचे३००फुटाचे धावपट्टी वर ५सेकंद ८७पॉंईट मधे धाव पुर्ण केली.
एक लाखाचे पहिले बक्षीस :
येथील शंकरपट आयोजन समितीचे वतीने जनरल गटात १५बक्षिसे, काटोल नरखेड तालुका गटात १५बक्षिस व दिग्रस बु गावाचे गटा करीता पाच बक्षिस असे एकूण ३५बक्षिस ठेवण्यात आले आहे.या शंकरपटाचे ‌चार मार्च पासून आयोजन करण्यात आले असून सहा मार्च रोजी समारोप आहे. 100 मीटर अंतरच्या शंकरपटात अनेक जोड्या अवघ्या पाच ते सहा सेकंदामध्ये हे अंतर पूर्ण करतात. अतिशय दर्जेदार बैल जोड्या या शंकरपटात सहभागी झाल्यामुळं ही लढत चांगलीच अटी-तटीची आहे. या शंकरपटात सर्वात कमी वेळात बाजी मारणाऱ्या बैल जोडीला पहिलं बक्षीस एक लाख रुपये, तर द्वितीय बक्षीस ८१ हजार रुपये आणि तृतीय बक्षीस ६१हजार रुपये रोख दिले जाणार आहे. यासह चौथ्या क्रमांकासाठी ४१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये, सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये, सातव्या क्रमांकासाठी ११ हजार रुपये, आठव्या क्रमांकासाठी 9 हजार रुपये, नवव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपये, तर दहाव्या क्रमांकासाठी १० हजार, अकराव्या क्रमांकासठी ०६हजार, बाराव्या क्रं -०८हजार, तेरावे क्रं साठी ,०५हजार रू , चौदावे क्रं ०४हजाररुपये, पंधराव्या क्र १०हजार रोख बक्षीसं आणि चषक दिलं जाणार आहे.
काटोल नरखेड तालुका गटात ४१हजार ते सात‌व दहा हजारांपर्यंत १५बक्षिसे असून गाव गटाचे पहिले सात हजार ते पाचवे एक हजार असे एकूण अकरा लाखांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
दिग्रस जलसा विषेश आकर्षण
अवघे १९८२ लोकसंखेच्या दिग्रस बु गावाचे नागरिकांचे संयुक्त सहकार्याने तसेच मनोज भैय्या खळतकर संकल्पनेतून जल्लोष बळीराजाचा याप्रसंगी‌ तिन दिवसीय शंकर पटाचे प्रसंगी पाच मार्च रोजी सायंकाळी सात वाजता विशेष आकर्षण म्हणून राज्यातील ‌नामांकित लावणीचा महासंग्रामात लावण्य दरबार मुंबई येथील सुप्रसिध्द लावणी साम्राज्ञींनी कडून बहारदार लावण्या सादर करण्यात येणार असून दिनांक ६ मार्च रोजी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला १६ व्यावसायिक नाटक
सध्या रंगभूमीवर फ्रेंड रिक्वेस्ट नाटक सुरू आहे, १० चित्रपट,
गाजलेले चित्रपट… भैरू पैलवान की जय
मानसन्मान, सिनियर सिटिझन
मानसन्मान चित्रपटासाठी लक्षवेधी अभिनेता पुरस्कार, मालिका कॉमेडी एक्सप्रेस( ७ वर्ष )गाजलेल्या व्यक्तिरेखा बंडू , मिस्टर ह
नाटकं जाणून बुजून नाटकासाठी महारष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
गलतीसे मिस्टेक नाटकासाठी खालील पुरस्कार प्राप्त, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता
झी टॉकीज महाराष्ट्र टाइम्स झी मराठी
संस्कृती कलादरपण पुरस्कार
अखिल भारतीय नाटय परिषदेचा पुरस्कार
राजश्री शाहू पुरस्कार लोककला शाहीर पुरस्कार प्राप्त हास्य अभिनेता आशिष पवार उपस्थित राहणार असल्याची आयोजकांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *