दारू व जुगार अड्ड्यांवर धाड घालुन किंमती ६,०६,०१०/- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) मोहाडी
अप. क्र. 170/2025 कलम 65 (फ) म.दा. का. आरोपी प्रफुल परसराम बावने, वय 38 वर्ष रा. कुपारी ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल १) एकुण 15 प्लास्टीक चुंगळ्यामध्ये प्रत्येकी 35 किलोप्रमाणे 2275 किलो प्रति किलो 200 रुपये प्रमाणे किंमती 4,55,000/-रु. 2) 06 प्लास्टीक ड्राममध्ये प्रत्येकी अंदाजे 60 किलो प्रमाणे 360 किलो सडवा मोहफास किंमती 72,000/- रूपये 3) 06 प्लास्टीक ड्राम रिकामे प्रत्येकी किमती 500 रु. प्रमाणे 3,000/- रूपये असा एकूण 5,30,000/- रुपयाचा माल
2) पोलीस स्टेशन तुमसर
अप.क्र. 389/25 कलम 65 (क) म.दा.का.
आरोपी अनिल दौलत गायधने वय 49 वर्ष रा. नवरगाव, ता.तुमसर, जि.भंडारा मिळुन आलेला माल 10 नग प्लास्टीक पिशवित प्रत्येकी 20 किलो सडवा मोहफूल रसायन एकूण 200 किलो प्रत्येकी कि 70/- रु प्रमाणे 14,000/- रुचा माल
3) पो स्टे लाखनी
अप. क्र. 224/2025 कलम 65 (क) म.दा.का.
आरोपी मनोज दलपत मांढरे वय 46 वर्ष रा. लाखनी जि भंडारा
मिळालेला मालः । नग प्लॉस्टिकच्या निळ्या ड्रम मध्ये प्लॅस्टिक पिशवीत सडवा मोहपास भरलेले दिसला. प्रत्येकी एका ड्रम मध्ये 50 किलो प्रमाणे एकूण 300 किलो मोहपास मिळाला त्याची प्रत्येक किलो प्रमाणे किंमत 200/- रु.असे एकूण 60,000/-रु.व प्रत्येक ड्रमची किंमत ३००/- प्रमाणे एकूण किंमत 1000/- रु. अशा एकूण मुद्देमाल 61,800/- रु.चा मुद्देमाल
4) पोलीस स्टेशन पवनी
अप क्र. 246/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी रमेश तुळशीराम लोखंडे वय 75 वर्षे कोरंभी नाका ताळेश्वर वार्ड पवनी ता. पवनी जि भंडारा मिळालेला माल संत्रा टेंगो प्रिमीयम देशी च्या एकुन 06 काचेच्या बोटल, प्रत्येकि 90 एमएल नी भरलेल्या कंपनी सिलबंद प्रत्येकि किमती 35/-रु. प्रमाणे एकुन किमती 210/-रु चा मुद्देमाल पोलीस स्टेशन मोहाडी, तुमसर, लाखनी व पवनी येथे दारु अड्ड्यांवर धाड घालुन एकुण किंमती 6,06,010/-
चा. माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.