दापोडी रेल्वे स्थानकातील जनरेटर रूममध्ये लागली आग

पत्रकार – सागर घोडके
पुणे
दापोडी रेल्वे स्थानकातील जनरेटर रूममध्ये लागली आग
पुणे – पुणे येथील दापोडी रेल्वे स्थानकावरील जनरेटर रूममध्ये काल रात्री ७:३०च्या सुमारास लागली भिषण आग . त्यामुळे तातडीने सर्व सिग्नल बंद करण्यात आले होते तेथील फाटक बंद केली. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे घटनास्थळी दोन अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्या.
पण याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला, या प्रवाशांना व कामगारांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडून लोणावळ्याकडे धावणारी लोकल तब्बल ३:३०तास उशिराने धावली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे जास्त प्रमाणात नुकसान झाले नाही व यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
लोकल गाड्या बंद असल्याने प्रवाशांना घरी जाण्यासाठी खुप मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे काल पिसीएमटी बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यासाठी मिळाली.