दहावीचा निकाल व अकरावीच्या प्रवेशाबाबत मोठा निर्णय
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१ गेल्या काही दिवसांपासून इयत्ता दहावीचा निकाल व अकरावी परदेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दहावीचा निकाल मूल्यमापन पद्धतीनेच होणार :?? दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे, […]
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता दहावीचा निकाल व अकरावी परदेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
दहावीचा निकाल मूल्यमापन पद्धतीनेच होणार :?? दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे, याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्यात दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारकडून गाईडलाइन्स ठरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण असणार आहेत. गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक याआधारावर 20 गुण दिले असणार आहेत. तसेच नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर 50 गुण अवलंबून असतील. अर्थात, जे विद्यार्थी कोविड पूर्व काळात नववीत होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या निकालावर 50 गुण दिले जाणार आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेसंबंधी हा निर्णय?? इ. 11 वीच्या प्रवेश परीक्षा राबववताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार महाविद्यालयांत प्राधान्य देण्यात येणार आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीनं दिलेले गुण मान्य नसतील, त्यांच्यासाठी कोविडनंतरच्या काळात परीक्षा आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जूनच्या अखेरीस दहावीचा निकाल लावण्याचा सरकारचा मानस आहे.