दलित सुधार वस्ती योजनेंतर्गत ३० कोटी १६ लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता
Summary
धुळे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३० कोटी १६ लक्ष रुपयांच्या विकासकामांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी काल (दि.१२) प्रशासकीय मान्यता दिली. पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून गुगल […]
धुळे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३० कोटी १६ लक्ष रुपयांच्या विकासकामांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी काल (दि.१२) प्रशासकीय मान्यता दिली.
पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून गुगल मीटद्वारे घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये ही मंजूरी देण्यात आली. सन २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाकरीता नागरी भागातील अनुसूचीत जातीकरीता आरक्षीत प्रभाग आणि अनुसूचीत जाती वसाहतींमध्ये विकासकामांचे प्रस्ताव पालकमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मनपा आयुक्त अजीज शेख , जिल्हा प्रशासन अधिकारी अमोल बागूल यांच्यासह शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा व साक्री येथील नगरपरिषद मुख्याधिकारी,सहायक समाजकल्याण आयुक्त आणि नगर रचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धुळे महानगर पालिकेने सन २०१९-२० करीता ७ कोटी ७४ लक्ष अंदाजपत्रकाचे ४२ कामे तर सन २०२०-२१ करीता १० कोटी ८३ लक्ष रकमेची ४८ कामे प्रस्तावित केली होती. या सर्व १८ कोटी ५७
लक्ष रकमेच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे मनपा आणि नगरपरिषद यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत असलेल्या कामांना प्रशासकीय कामे व निधीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यात धुळे महानगरपालिकेला ९० कामांसाठी १८ कोटी ५७ लक्ष,_ शिरपूर नगरपरिषद २० कामांसाठी ३ कोटी ७२ लक्ष, दोंडाईचा नगरपरिषदेच्या ९ कामांसाठी ४ कोटी ५० लक्ष, शिंदखेडा नगरपंचायतीच्या ५ कामांसाठी २ कोटी २८ लक्ष, साक्री नगरपंचायतीच्या ४| कामांना १_कोटी ८ लक्ष रूपयांच्
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
शेख चांद
धुळे