थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवेदन
Summary
लाखनी:- ओबीसी विघार्थांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करण्यात यावी. व शिष्यवृत्तील अनुदान वाढविण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी आज दिनांक १६/०९/२०२५ रोजी तहसील कार्यालय लाखनी येथे विघार्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष टोनल भिवगडे सह निवेदन सादर केले. महाराष्ट्र […]
लाखनी:- ओबीसी विघार्थांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करण्यात यावी. व शिष्यवृत्तील अनुदान वाढविण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी आज दिनांक १६/०९/२०२५ रोजी तहसील कार्यालय लाखनी येथे विघार्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे
तालुका अध्यक्ष टोनल भिवगडे सह निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्यातील मागिल काही वर्षापासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे विघार्थांचे शिक्षण धोक्यात आले असून पालकांनाही सुध्दा मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने तातडीने लक्ष घालून थकित शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी अशी आग्रहाची विनंती विघार्थांनी केली आहे. निवेदन सादर
करतेवेळी युवक अध्यक्ष नामे,अमोल गुरगे, विघार्थी अध्यक्ष, टोनल भिवगडे, सामाजिक कार्यकता जितु शामकुवर, ज्येष्ठ विघार्थी अमन हटवार, कार्तिक धरमसारे, अंगद आगासे, आर्यन मडावि, कार्तिक गिरेपुंजे मोठ्या संख्येने विघार्थी
उपस्थित होते.
