तोडा गुलामगिरी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✒️
Summary
तोडा गुलामगिरी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✒️ हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध ,चार्वाक,संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, आद्य क्रांतिकारक तंट्या भिल्ल, क्रांतिकारक बिरशा मुंडा, महात्मा फुले,राजश्री शाहू महाराज, बोधी सत्व डॉ बाबासाहेब ,अण्णाभाऊ साठे, वैराग्य मूर्ती गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी […]
तोडा गुलामगिरी
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
✒️
हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध ,चार्वाक,संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, आद्य क्रांतिकारक तंट्या भिल्ल, क्रांतिकारक बिरशा मुंडा, महात्मा फुले,राजश्री शाहू महाराज, बोधी सत्व डॉ बाबासाहेब ,अण्णाभाऊ साठे, वैराग्य मूर्ती गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जीवाचे रान केलं
महापुरुषांच्या परिश्रमातून आपणास स्वातंत्र्य, समता, यासारखी मूल्य प्राप्त झाली. आपल्या या जीवनावर*
*महापुरुषांचे ऋण आहेत हे कसं विसरून जाणार* *अजाणतेपणाने आम्ही मनुवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मदत करीत आहोत . किमान बुद्धिजीवी वर्गाने तरी या महापुरुषांची विचारधारा घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी आपणास मिळालेले अधिकार संरक्षित ठेवण्यासाठी आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावे. हा जन्म अमूल्य आहे, मानवी कल्याणाच्या उत्थानासाठी. बुद्धाने सांगितलेला सम्यक मार्ग व बाबासाहेबांनी दिलेले संविधानिक अधिकार शाबूत ठेवण्यासाठी महापुरुषांच्या विचारधारेवर ; त्यांच्या कार्य प्रणालीवर या देशातील बुद्धीजीवी वर्गांनी कार्य करावे ही किमान अपेक्षा. महापुरुषांनी दिलेले अधिकार कायम ठेवण्यासाठी किमान तुम्ही त्यांचे कार्य जरी करत नसाल तरी मनुवादी व्यवस्थेसाठी तूम्ही मदत करू नका!
सम्यक बुद्धाला अनुसरून आपण आपले व इतरांचे जीवन कल्याणमय करण्यासाठी प्रयत्न करूया .
आपल्या सर्वांचे कल्याण हो!
नमो बुद्धाय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-विनोद लांडगे
